मनसे पक्षाच्या अंतर्गत वादाला कंटाळून जुने जाणते नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला राम राम ठोकला

सविस्तर वृत : मनसे ला अनेक बडे नेते राम राम ठोकत आहेत मागेच कोकण चे खेडचे वैभव खेडेकर आणि रायगड च्या आणि चिपळूण च्या अध्यक्षानी राजीनामे दिले होते आणि मनसे बदल आपली खद खद व्यक्त केली होती त्यातच आता मनसे चे जुने जाणते नेते प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझी अपेक्षा नव्हती पण उपेक्षा झाली, असं म्हणत त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे आणि प्रकाश महाजन यांनी मनसेतील सर्व पदांचा राजीनामा ही दिला आहे
प्रकाश महाजन म्हणाले की, “कधीकधी आपल्याला या वयात लक्षात आलं नाही, तर काय उपयोग?. आता आपली गरज तिथे फारशी राहिलेली नाही. काही गोष्टी मध्यंतरी घडल्या त्या सगळ्या लोकांना माहित आहेत. म्हणून मी फक्त जर मनसेत अपराधी असेन तर फक्त अमित ठाकरेंच्या बाबतीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोललेलो की, अमितजी मी तुमच्यासोबत, तुमच्या मुलासोबत काम करेन. मनुष्य एक विचार करतो नशीब काही दुसरच ठरवतं
प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू, माजी खासदार पूनम महाजन यांचे काका, तर मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत. त्यामुळे आता प्रकाश महाजन भाजपची वाट धरणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे
माझ्यावर जेवढ्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या व्यवस्थित पार पडल्या. पण त्याचं म्हणाव तेवढ कौतुक झालं नाही” ही खंत प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली
