

वायनायड मध्ये जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले त्यात अनेक लोकांचे नाहक बळी गेले.भूस्खलनात अनेक माणसे बेपत्ता झाली आहेत. त्यांची शोध मोहीम चालू आहे रेस्क्यू टीम, तेथील स्थानिक लोक प्रशासन आणि भारतीय सैन्य दल आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम करत आहेत. आता पर्यंत २७० हून अधिक लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यास यश आले आहे. अनेक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी सैन्यदल शर्तीचे प्रयत्न करत आहेत. शनिवारी सकाळी बचाव पथकाने अवजड यंत्र सामग्री आणि अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम सुरु केली. वायनायडमधील स्थानिक शासनाला मृत देहाची ओळख पटवणे कठीण जात आहे.

तेथे लागणाऱ्या प्राथमिक सुविधा पुरेपूर प्रमाणात दिली जाईल असे राज्याचे मुखमंत्री मा. पिनराई विजयन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली. वायनायड येथे मदतीसाठी भारतामधील काही NGO आणि दक्षिणात्य कलाकार पुढे सरसावले. जेणे करून प्रशासनासोबत काम करून तेथील रहिवाश्यांना मदतीचा हात दिला जाईल.
वायनायडमध्ये ३० जुलै पासून सुरु असलेले शोध आणि बचाव कार्य अंतिम टप्यात पोहचल्याची माहिती तेथील स्थानिक प्रशासनाने दिली.
