राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना थेट इशारा दिला आहे….

सविस्तर वृत्त: विधानसभा निवडणुकाजवळ आल्यामुळे नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि दौरे करणे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु झाले आहेत. अशातच राज ठाकरेंचा नांदेड दौरा चालू असताना राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असताना अचानक त्यांच्या गाडी समोर सुपाऱ्या फेकल्या गेल्या आणि घोषणा दिल्या गेल्या. एक मराठा लाख मराठा त्याचे कारण असे की राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून स्वतःची भूमिका मांडली की, आरक्षण हे आर्थिक निकषांवरून मिळाले पाहिजे. जे आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. खरतर महराष्ट्रासारख्या राज्यात आरक्षणाची गरज काय कारण देशातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा आपले राज्य समृद्ध असून येथील नागरिकांना नोकरी आणि शिक्षण देता येऊ शकते. पण इकडे परप्रांतीयांना नोकऱ्या दिल्या जातात असे राज ठाकरे साहेबांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या या मतांवरून मराठा आंदोलन कर्त्यांच्या मनात नाराजी व्यक्त होऊन ते आक्रमक होऊन त्याने हे कृत्य केले जेंव्हा पोलिसांकडून याच आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेण्यात आले तेंव्हा तपासातून असे निष्पन्न झाले की, यामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हे सर्व पाहून राज ठाकरे यांनी पोलिसांकडून सर्व माहिती घेऊन एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना इशारा दिला कि,“मी जर माझ्या वर आलो तर तुमची एक ही सभा माझे कार्यकर्ते घेऊन देणार नाहीत, माझे मोहोळ उठल्यास ते तुम्हाला परवडणार नाही आणि निवडणूक जवळ आली की जातीपातीच राजकारण पडद्यामागून करू नये”, असा इशारा दिला.
