विनेश फोगट चे मनोबल वाढवाण्यासाठी पी.एम मोदींचे खास ट्वीट म्हणाले ……….

सविस्तर वृत्त ………. पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या फायनल्समध्ये भारताकडून असलेल्या विनेश फोगट फायनलपूर्वी काही ग्रॅम्सने वजन जास्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवलं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 50 किलो वजनी गटाच्या कुस्तीगीर म्हणून असलेली विनेश फोगट ने मंगळवारी उपांत्य फेरीत सामना खेळत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझला अस्मान दाखवत तिचा 5-0 ने पराभव केला ह्या दणदणीत कामगिरी ने भारताला चौथे पदक निश्चित झाले होते. मात्र अंतिम सामन्यापूर्वी ती अपात्र घोषित झाल्याने सर्व कुस्तीगीर प्रेमींना आणि भारताला मोठा धक्का बसला आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी केलेल्या वजनात विनेशच्या वजनात काही ग्रॅम्सने तफावत आढळल्यामुळे ती अपात्र घोषित झाली आहे .
विनेश फोगट ऑलिम्पिक च्या अंतिम सामन्यात अपात्र आहे हे कळताच त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत.. अपात्र घोषित ठरल्यानंतर सर्व भारतीयांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनेश चे मनोबल वाढवण्यासाठी खास ट्विट केलं आहे.

‘तू भारताचा अभिमान आहेस’, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट-

‘विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या धक्क्याने मन दुखावलं. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्याचवेळी मला माहित आहे की तू लवचिकतेचं प्रतीक आहेस. आव्हानं स्वीकारणं हा तुझा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. आणखी मजबूत बनून परत ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठिशी आहोत,’ असं त्यांनी लिहिलंय.
विनेश फोगट काही कारणांसाठी तू ऑलिम्पिक मध्ये अपात्र ठरवली असलीस तरी आम्हा भारतीयांसाठी तूच विजेता आहेस .अशी सर्व भारतीयांची भावना आहे .
