रक्षाबंधन निमित्त महायुतीकडून राज्यातील महिलांना मोठी भेट

मंत्री. अदिती तटकरे यांच्याकडून आज राज्यातील महिलांसाठी खुशखबर ……..

सविस्तर वृत्त: मुख्यमंत्र्यांनी सुरु केलेली माझी लाडकी बहिण योजनेचा उपयोग राज्यातील अनेक महिलांना करता येईल. या योजनेमुळे महिलांच्या रोजच्या जीवनात सरकारला फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांची आर्थिक स्थिती बळकट करता येईल. असे महायुती सरकारच्या  योजने मागचे धोरण आहे. राज्यातील महिलांचे सक्षमिकरण होणे हा या मागचा हेतू आहे .

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्यापूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा  करण्यात येईल, अशी घोषणा सरकारने केली होती.

पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यभरातील महिलांच्या खात्यात ३००० हजार रुपये जमा झाले आहेत. तीन हजार रुपये जमा होताच बालकल्याण विकास मंत्री मा. अदिती तटकरे यांनी विडीओ शेअर करत ही माहिती दिली.

३१ जुलै पूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज भरले आहेत त्यांना १७ ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील असे सरकारने स्पष्ट केले आहे.ह्या पूर्वी या योजनेतील एक हप्ता ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. उर्वरित लाभार्थ्यांना ही पैसे लवकर जमा होतील .

लाभार्त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे, हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर चालू आहे. ह्या कामासाठी सरकारने अंगणवाडी सेविका, आपले सरकार सेवा केंद्र(सी एस सी), संगणक परिचालक यांच्या मार्फत या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक महिलेला मिळालाच पाहिजे असा आदेश दिला आहे. या सर्वांना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने चे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे असे सरकार कडून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकांना लक्षात घेता सत्ताधारी पक्षाचे हे एक मोठे पाऊल मानले जाऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *