Vidhan Sabha Election 2024: राज्यातील पहिलीच लढाई बाप विरुद्ध बेटा? वडील म्हणाले, ‘त्याचा बाप..’


Narhari Zirwal vs Gokul Zirwal in Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवारीच घोषणा केली आहे. एकीकडे जागावाटपाची चर्चा अद्याप सुरु असतानाच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पक्षाच्या दिंडोरीमधील जनसमान यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. “दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील. नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील,” असं म्हणत तटकरेंनी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला. या घोषणेमुळे आता या मतदारसंघामध्ये बापविरुद्ध बेटा अशी थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे.

Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *