मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर

अनेक दिवसांच्या प्रतीक्षानंतर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून मोठा पॅकेज जाहीर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा.

सविस्तर वृत : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला, तेव्हापासून मदतीच्या पॅकेजची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यातच, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकजेची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल, असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत. शेतकरी, नुकसानग्रस्त घरे, जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे.

राज्यात यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत आयोजित पत्रकार परिषदेत अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकूण 31,628 रुपये कोटींचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याचा सरकारचा आग्रह असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले

>> मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

> जेवढं नुकसान झालंय त्याची 100 टक्के नुकसान कोणीच देऊ शकत नाही. शेतकरी जास्तीत जास्त पायावर उभा राहिला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे.

> 29 जिल्हे आणि 253 तालुके यांना मदत करणार आहोत. 2059 मंडळांमध्ये सरसकट नुकसान ग्राह्य धरलं आहे. आता सरसकट नुकसान ग्राह्य धरणार

> नव्याने घर बांधणीस मदत करणार असून प्रधानमंत्री आवास योजनांमधून नव्याने घरं बांधून देणार आहोत.

> अंशत: पडझड झालीय त्यांना देखील मदत करणार आहोत.

> मृत्यू पावलेल्या प्रत्येकी दुधाळ जनावरा मागे 37,500 रुपयांची मदत करणार

> कुक्कुटपालनासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत

> NDRF मदतीचा 3 जनावरांचा नियम काढून टाकण्यात आला असून जेवढी जनावरं दगावली तेवढी भरपाई मिळणार

> खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3 लाख 50 हजारांची भरीव मदत

> खरडून गेलेल्या शेत जमीन नुकसान भरपाई 47 हजार रुपये देणार

> प्रति विहीर 30 हजार रुपये – ग्रामीण भागातील बाधित झालेल्या पायाभूत सुविधांसाठी १५०० कोटी

> ओला दुष्काळ संदर्भात दुष्काळाच्या अनुषंगाने सर्व मदत दिली जाईल, वीजबिल, शालेय शिक्षण शुल्क माफीचे महत्त्वाचे निर्णय

> थेट मदत – 6175 कोटी रुपये थेट मदत

> रब्बी पिकासाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी 6175 कोटी

> विमा असलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना 17 हजार हेक्टरी मदत

> कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार तर बागायतीला 50 हजार पर्यंत मदत मिळेल

> पीकविमा किमान 5000 कोटी राज्य सरकारकडून 31, 628 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

या पॅकेजचे वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्रीय आपत्तिमूल्य प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही मदत जास्त आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जरी या पॅकेजमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडणार असला तरी, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. विमा कंपन्यांच्या मनमानीवरही लगाम घालण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्यांच्याकडून योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *