पश्चिम रेल्वे मधील डहाणू स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेस चे दोन डबे रेल्वे पासून वेगळे झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

सविस्तर वृत : डहाणू रेल्वे स्थानकाजवळून जाणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेसचे दोन डबे अचानक वेगळे झाल्याची महत्त्वपूर्ण घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू रेल्वे स्थानकाजवळून जात असताना अमृतसर एक्स्प्रेसचे दोन डबे मुख्य रेल्वेपासून वेगळे झाले
पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकाजवळ आज एक मोठी घटना टाळली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या अमृतसर एक्सप्रेसच्या दोन डब्यांचा अचानक गाडीतून तुटून वेगळा झाल्याचा प्रकार घडला. गाडी वेगात असताना डबे वेगळे झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे आणि गाडीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. घटनेनंतर डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास चाळीस मिनिटे ठप्प झाली
रेल्वेच्या सुरक्षाविषयक बाबींकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनीही या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डहाणू परिसरात झालेल्या या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने गंभीर दुर्घटना टळली असली तरी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे.
