लाल परीची चाके पुन्हा धावणार…

सविस्तर वृत्त: ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एस टी च्या कृती समितीकडून संपाची हाक देण्यात आली होती. त्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून संप केला गेला होता. संप करू नये यासाठी अनेक राजकीय स्तरावरून एस टी च्या कर्मचाऱ्यांची मनधरणी चालू होती. पण कार्मचारी काम बंद आंदोलन करून आपल्या मागण्यांवर ठाम होते. जो पर्यंत राज्य सरकार लिखित मध्ये आम्हांला आमच्या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भात कोणतेही पत्रक देत नाहीत तो पर्यंत संप हा चालूच राहणार आहे असे जाहीर केले होते. या संपामुळे ऐन सणासुदीच्या वेळी अनेक लोकांचे ,विद्यार्थ्यांचे हाल झाले एस टी संप पुकारल्यामुळे लोकांना एस टी बस स्थानकामध्ये खोळंबून राहण्यास भाग पडले. राज्य भरात २५१ बस स्थानकांपैकी (आगार) ९८ आगार बंद होते दिवस भरात सुमारे ६०% वाहतूक बंद होती. एस टी च्या संपाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपयांचे तर दुसऱ्या दिवशी २० कोटी रूपयांचे महसूल बुडून नुकसान झाले आहे.
एस टी च्या ११ कामगार संघटनेच्या कृती समितीने संप पुकारला होता. अखेर एस टी कर्मचाऱ्यांना संपाचा आणि लोकांचे अतोनात होणारे हाल बघून राज्य सरकारने कृती समितीची बैठक बोलावून आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांकडून यावर तोडगा काडला गेला. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यात मूळ वेतनात ६५०० रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा तोडगा कृती समितीकडून मान्य झाल्याचे समजताच कृती समितीच्या आव्हाह्नानंतर संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता वेळेवर आणि कमी खर्चात आपल्या गावी जाता येईल. आणि सर्वसामान्यांचे जे संपामुळे हाल होत होते ते हाल ही आता थांबणार आहेत.
