७८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधले.

पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधले……

सविस्तर  वृत्त: आज भारत देशाचा ७८ वा स्वतंत्र दिन आहे. ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून देशाला संबोधित केले. आणि काही महत्वाच्या विषयांवर देशाच्या प्रगती संदर्भात पंतप्रधान मोदींनी देशाला काही गोष्टींचे आवाहन केले.

यात युनिफोर्म सिविल कोड आणि बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल पीएम. मोदी बोलले संविधान निर्मात्यांची स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. या विषयांवर देशात व्यापक चर्चा झाली पाहिजे. जे कायदे धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करतात, आणि उच्चनीच करतात अशा कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही . युनिफोर्म सिविल कोड मध्ये ७७ वर्ष घालवली. “आता सेक्यूलर सिविल कोड ह्या दिशेने आपण आता गेलो पाहिजे”. असे पंतप्रधान मोदिजी म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने अनेकदा युनिफोर्म सिविल कोडवर चर्चा केली आदेश ही दिले आहेत आपण जे सिविल कोड घेऊन जगत आहोत ते खरतर कम्युनल सिविल कोड आहे. हे भेदभाव करणारे सिविल कोड आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशाला एक बनवणे श्रेष्ट बनवणे आणि लोकशाहीला मदत करणे यात देशाच्या संविधानाची महत्वाची भूमिका राहिली आहे. आणि आपण ती भूमिका सर्व भारतीयांनी एक मताने राखली आहे ह्या देशात  दलित, शोषित आणि वंचित या घटकांना सुरक्षा देण्याचे काम आपल्या संविधानाने केले आहे .

संविधानाची ७५ वर्षे साजरी करत असताना संविधानाने १४० कोटी देशवासियांवर केंद्र सरकार, राज्य सरकार या सर्वांनी आपली कर्तव्ये बजावली आहेत.आपण लोकशाहीला मजबूत करून आणि नव्या शक्तीने पुढे जाऊ असे पी एम मोदींनी संबोधले .

बांग्लादेशात जे काही घडले आहे त्या बद्दल मोदींनी चिंता व्यक्त केली आणि त्यांनी सांगितले. की तेथील परिस्थिती लवकरच सामान्य होईल. अशी १४० कोटी देशवासियांना चिंता आहे. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे. आणि बाजूच्या देशामध्ये सुखशांती राहिली पाहिजे हीच भूमिका नेहमी भारताने घेतली आहे.

असेच आपले संस्कार आहेत भारत नेहमी शांतिप्रिय देश म्हणून ओळखला जातो आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला प्रगती पथावर घेऊन जाऊ अशी अशा देश वासियांपुढे मांडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *