एस. टी. कर्मचारी संपावर….

सविस्तर वृत्त: गणेश उत्सवाला महाराष्ट्रात संपूर्ण थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी मोठ्या संखेने चाकरमानी आपापल्या गावी मोठ्या संख्येने जात असतात आणि महाराष्ट्राचा साठ टक्के प्रवास हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा(msrtc) मार्फत केला जातो कारण, एस टी ही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात पोहोचणारे एकमेव साधन आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास आणि प्रवासाचे अवलंबन एस.टी.वरच असते त्यातच एस.टी. कडून प्रवाश्यांसाठी वेगवेगळ्या योजना देखील राबवल्या जातात. त्याचा उपयोग खेड्यापाड्यातील गोरगरीब सामान्य जनेतेला होत असतो. त्यामुळे एस टी महामंडळाच्या आगारात लोकांची सतत वर्दळ दिसून येत असते आणि साणासुदीच्या काळात एस टी कडून दोन महिने आधीच आरक्षणाला सुरुवात होते, आरक्षण हे संपूर्ण महिनाभराच्या आतच फुल होते अशातच, एस टी मध्ये अहोरात्र मेहनत करून प्रवाश्यांना सुखसोयी देणाऱ्या कर्मचार्यांना अपुऱ्या मानधनाला सामोरे जावे लागते.
एस टी ने ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर आपल्या कर्मचारी मागण्यांसंदर्भात संपाची हाक दिली आहे. या संपाच्या हाकेमुळे राज्य सरकार ही चिंतेत आहे. संप मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारची एस टी च्या समिती सोबत बैठका घेऊन त्यांची मनधरणी करणे सरकार कडून चालू आहे, पण त्यात सरकार अपयशी ठरले आहे. एस टी कर्मचारी कृती समितीची राज्य सरकार सोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. एस टी कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीत काही तोडगा न निघाल्यामुळे एस टी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. ऐन सणासुदीत कर्मचार्यांनी संप करू नये असे मंत्री उदय सामंत यांनी आव्हाहन केले आहे.
आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. एस टी च्या कृतीसमितीची बैठक उदय सामंत सोबत झाली पण, एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे सरकारची ही बैठक निष्फळ ठरल्याचे समजले आहे. आज होणाऱ्या कृती समिती सोबत बैठकीत मुख्यमंत्री यांच्याकडून काही तोडगा निघतो का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एस टी कर्मचार्यांच्या संपातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे-
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील घरभाडे भत्ता मिळावा.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावे.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता मिळावा.
- एस टी कर्मचाऱ्यांना ५००० रुपयांची वेतन वाढ मिळावी या मूळ मागण्या एस टी च्य कृती समिती कडून सरकार समोर ठेवण्यात आल्या आहेत .
- एस टी महामंडळाला महाराष्ट्र शासनात विलीन करून घ्यावे ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
कृती समितीचे मुख्य संदीप शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होवून अंतिम निर्णय होई पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वकील गुणरत्न सदा वर्ते यांनी एस टीच्या या संपावर आणि मागण्यांवर टीका केली आहे, वकील गुणरत्न सदा वर्ते असे म्हणाले कि,” संघटना म्हणून जी कृती समिती म्हणत आहात तिला मी, “किडे समिती म्हणून मानतो” हे लोकं टक्केवारी मधली मलाई खाणारे लोकं आहेत “तुम लढो हम कपडे संभालते हे” अशी ही कृती समिती आहे या टीकेवर कृती समिती सदा वर्तेच्या टीकेला उत्तर म्हणून कृती समिती कडून संदीप शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वतःचा टीआरपी वाढवून झाला आहे. कष्टकरी एसटीच्या कर्मचार्यांचा गल्ला जमा करून घरात पैसे मोजण्याची मशीन आणली आहे. अशी टीका संदीप शिंदे यांनी सदा वर्ते वर केली आहे. या सर्व गोष्टींकडे एस टी ने प्रवास करणाऱ्या सामान्य जनतेचे हाल एस टी करणार कि, नाही? किंवा हे हाल होवू नये म्हणून सरकार या मागण्यांवर लक्ष देणार की नाही? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कारण सामान्य जनतेला तिकीट (प्रवासी भाडे) कमी असल्याकारणाने एस टी ही सर्वसामान्यांची प्रवसाची जननी ओळखली जाते. पण जर ऐन सणासुदीत संप झाला असल्यामुळे प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यास तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी तारेवरची कसरत करवी लागत आहे मोठ्या प्रमाणात प्रवासाचे हाल सोसावे लागत आहेत. प्रवाश्यांना आपल्या गावी जाण्यास प्रवासासाठी जास्त पैसे मोजून खाजगी गाड्यांचा वापर करून गणेश उत्सवाच्या काळात प्रवास करावा लागेल. सरकार यावर कितपत लक्ष देणार, कि नाही? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे…!
