शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात गडकरींकडून कामकाजावर प्रश्न चिन्ह…

सविस्तर वृत्त: नितीन गडकरी हे केंद्रा मधील एक बेधडक बोलणारे आणि आपल्या कामाच्या चांगल्या दर्जाला घेवून ओळखले जातात. नितीन गडकरी दिल्लीच्या कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यात अनावरण करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला ह्याच दुर्घटनेसंदर्भात महायुतीकडून आणि पी.एम. नरेंद्र मोदी यांच्याकडून माफी मागण्यात आली, पण ह्या प्रकरणाला विरोधकांनी अजून धरून ठेवले आहे. यातच केंद्रातील मंत्री नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री) यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले कि, पुतळा उभारताना चांगल्या दर्जाचा स्टेनलेस्टीलचा वापर केला पाहिजे होता. तर पुतळा पडला नसता नितीन गडकरी पुढे असेही म्हणाले, समुद्र किनारी बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचा वापर करणे गरजेचे आहे कारण आम्ही सुद्धा समुद्र किनाऱ्यावरील रस्ते आणि उड्डाण पूल बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा वापर करत असतो. स्टेनलेस स्टीलचा वापर बांधकामात केल्यामुळे समुद्रावरून वाहणाऱ्या खाऱ्या हवेमुळे गंज पकडण्यास मज्जाव होतो. आणि बांधकाम दीर्घकाळ टिकते. गडकरी असेही म्हणाले, समुद्र किनाऱ्यावरील उड्डाण पुलांसाठी कोटिंग पावडर वापरल्यानंतर देखिल सळ्यांवर गंज पकडल्याचे दिसून आले आहे. यामुळेच महाराष्ट्रात उड्डाण पुले बांधताना समुद्रापासून तीन किलो मीटरच्या आत बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो “हाच वापर मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी केला असता तर ही दुर्घटना घडली नसती”. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. आणि कामाचा दर्जा कसा असावा हे सुद्धा स्पष्टवक्तेपणे बोलून दाखवला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात आज जेष्ठ नेते शरद पवारांना कोल्हापूर मधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले शरद पवार पुढे असेही म्हणाले कि, “गडकरी कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात आणि कोणतेही काम हाती घेतल्यावर त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच त्या कामाला सुरुवात करतात आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कामाचा दर्जा दिसून येत आहे”. तसेच गडकरींनी मालवण येथील घटनेला घेवून जे विधान केले आहे त्या कामाच्या दर्जाचाही त्यांनी अभ्यास केला असेल, असे शरद पवारांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले आहे. नितीन गडकरींच्या या वक्तव्यावरून विरोधकांना पुन्हा महायुतीवर टीका करण्याचे बळ मिळत आहे कि, काय हे पाहणे गरजेचे असेल…!
