रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात आज कडकडीत बंद.

मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून आज माणगाव शहर बंद राहिले…………

सविस्तर वृत्त: गेली कीत्येक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले असून त्याचा शेवट हा प्रत्येक सरकारकडून दिला गेला असून तो कोणत्याही सरकारकडून पाळण्यात किंवा पूर्ण करण्यात आला नाही .मुंबई गोवा महामार्ग हा मोठया भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकल्यामुळे तो एवढया वर्षामध्ये पूर्णत्वात गेला नाही. हा महामार्ग आता कोकण वासियांसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. ह्या महामार्गावर पावसामुळे नवीन झालेल्या सिमेंट कोंन्क्रिटीकरणालाही मोठमोठे खड्डे आणि भेगा पडल्या आहेत. त्यामुळे इकडून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रोजचा जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एवढया वर्षामध्ये अनेक प्रवासी या खराब रस्त्यामुळे मृत्यूमुखी पडले, पण कोणत्याही सरकारला अजून पर्यंत जाग आलेले नाही. लोकांनी अनेक आंदोलने केली मुंबई गोवा महामार्गावर असलेली आताची परिस्थिती अनेक प्रसार माध्यमांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सरकारचे ह्या महामार्गावर दुर्लक्षच राहिले आहे. आता सणासुदी, गणेश उत्सवाच्या दरम्यान कोकणात चाकरमानी मोठया प्रमाणात प्रवास करत असतात त्यांना ही या गोष्टींचा त्रास सहन करून आपापल्या गावी येणे जाणे करावे लागते.

महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे या साठी जनाक्रोष समितीच्या वतीने माणगाव येथे आमरण उपोषण गेली चार ते पाच दिवस सुरु आहे. आंदोलकांना पाठींबा देण्यासाठी आज माणगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. “या बंद मध्ये मेडिकल आणि डॉक्टर्स व अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण माणगाव शहरात कडकडीत बंद पाळला होता”. ह्या आंदोलन कर्त्यांना पाठींबा देण्यासाठी माणगाव वासियांनी, व्यापाऱ्यांनी बंदला पाठींबा देऊन बंद यशस्वी आणि शांतीपूर्ण पार पाडला. ह्या उपोषणाला राज्य सरकारकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन देऊन नंतर बैठक नाकारली, “त्यामुळे आंदोलकांमध्ये तसेच कोकण वासियांमध्ये  सरकारविरुद्ध नाराजीचे सूर उमटले आहेत”. सरकारच्या अश्या वागणुकीमुळे आज पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचे समजते, येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये कोकण वासियांना या खडतर प्रवासाचा आनंद घ्यावा लागणार आहे, असे सरकारच्या एकंदरीत वागणुकीवरून दिसत आहे………!

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *