गणेश उत्सवादरम्यान जड वाहनांस बंदी.

कोकणात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी सरकारकडून नवीन माहीत समोर….

सविस्तर वृत्त:  गणेश उत्सव हा पुढच्या महिन्यात असल्यामुळे दरवर्षाप्रमाणे चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात असतात. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते आणि वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. वाहतूक कोंडी गणेश उत्सवादरम्यान एवढी असते. की, ५० कि.मी. अंतर कापण्यासाठी चार ते पाच तास लागतात आणि त्यामुळे गणेश उत्सवासाठी वेळेवर चाकरमान्याना पोहोचता येत नाही. आणि आताचा मुंबई गोवा महामार्ग हा खड्डेमय झाला आहे. सरकारकडून दरवर्षी प्रमाणे त्याची डागडुजी करण्याचे काम चालूच असते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कोकण वासियांना करावाच लागतो, त्यातच माल वाहून नेणारे मोठ मोठे कंटेनर्स खराब रस्त्यांमुळे, आणि खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे आणि वाहने बदं पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या मुळेच सरकारकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेहमीच एक पळवाट काढली जाते, “ती म्हणजे गणेश उत्सवाच्या आधी जड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर येण्यास बंदी घातली जाते”. तशी बंदी ह्या वर्षीही सरकार कडून शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी एक पत्रक काढून जाहीर करण्यात आली. त्यात असे सांगण्यात आले आहे की, ५ सप्टेंबर पासून ते ८ सप्टेंबर पर्यंत तसेच ५ व ७ दिवसाचे गौरी-गणपती विसर्जनानंतर आणि ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर तसेच अनंत चतुर्थीच्या दिवशी १७ व १८ सप्टेंबर च्या दरम्यान १६ टन किंवा त्या पेक्षा जास्त वजनांच्या गाड्यांना मुंबई ते सावंतवाडी दरम्यान बंदी घालण्यात आली आहे .

गणेश उत्सवाच्या पूर्व तयारीच्या प्रवासाआधी म्हणून ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११, तसेच गौरी विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी रात्री ८, आणि ११ दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर साकळी ८ वाजल्यापासून  दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी राहील यात दुध,पेट्रोल,किंवा सिलेंडर, मेडिकल व्यवस्था,अन्नधान्य भाजीपाला व नाशवंत माल ही जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी राहणार नाहीमहामार्ग क्र.६६ संबंधित काम करणाऱ्या वाहनांवर बंदी राहणार नाही. महामार्गाचा विचार करून जिल्ह्याचे पोलीस आयुक्त ही परिस्थितीनुसार आपल्या स्थरावर योग्य निर्णय घेऊन निर्बंध शितील करण्याचा अधिकार यांना देण्यात आले आहे .jnpt आणि जयगड बंदरातून मालाची आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांना यात सूट देण्यात आली आहे. अशी नियमावली राज्य सरकारकडून मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेश उत्सवासाठी लोकांच्या फायद्याचे असणार आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *