मुख्यमंत्र्यांकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, दिले हे निर्देश.

एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गावर स्वतः उतरून केली पाहणी….

सविस्तर वृत्त: आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीवर होते. गणेश उत्सव जवळ आल्यामुळे कोकणातील चाकरमानी यांची गणेश उत्सवाला आपापल्या गावी जाण्यासाठी प्रवास चालू होतो. आणि हा प्रवास गेली कित्येक वर्ष खडतर चालू आहे. अनेक सरकारांकडून मुंबई महामार्गाला पूर्ण करण्याबद्दल अनेक वचने देण्यात आली, पण आज पर्यंत ती वचने कुठलेही सरकार पूर्ण करू शकले नाही.

कोकण वासियांना नेहमी सरकारच्या ह्या बेजाबदारपणामुळे जीव मुठीत घेऊन दर वर्षी  प्रवास करावा लागतो. अशातच वारंवार कोकण वासियांकडून आणि काही संस्थांकडून रस्ता चांगल्या दर्जाचा मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली. आणि ह्याचीच दखल घेऊन एकनाथ शिंदेंनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. ही पाहणी करत असताना स्वतः मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले. आणि तातडीने ह्या महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्विक सेटिंग हार्डनर (एम-60) चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का ह्याचा ही ते आढावा घेत होते. सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या बैठकीत संबंधित यंत्रणा व रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, ह्या सूचनेची अंमलबजावणी झाली कि, नाही ह्याचा आढावा त्यांनी स्वतः दौऱ्यावर जावून घेतला. गडब गावात नवीन पद्धतीने खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या गावात स्वतः रस्त्यावर उतरून चाललेल्या कामाची पाहणी केली. कोकणातील महामार्गत अनेक ठिकाणी पडलेले खड्डे हे अशाच पद्धतीने बुजवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

गणेश उत्सवापूर्वी जास्तीत जास्त खड्डे बुजवून मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. जिओ पॉलिमर, जिओ कास्टिंग, रेपीड क्विक सेटिंग पॉलिमर अशा पद्धतीने कास्ट केलेले पॅचेस वापरून कड्डे बुजवण्यात येतील तसेच हे काम चालू असताना कोणत्याही अधिकार्यांनी किंवा ठेकेदारांनी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कोणतीही प्रकारची हयगय न करता कार्यवाही केली जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी खाजदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, पनवेल महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे, नवीमुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, आणि एनएचएआय चे वरिष्ट अधिकारी, तसेच वाहतूक पोलीस अधिकारी हे या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी मुंबई महामार्गाची स्वतः पाहणी करून कामाचा दर्जा बघून प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत. आणि याचे, पालन न झाल्यास कार्यवाहीचे आदेश ही दिले आहेत .

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *