राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार

राज्यात पुन्हा मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट हवामान खात्या कडून सतर्क राहण्याचे नागरिकांना आव्हान

विस्तर वृत्त : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने परिणामी महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भातही १३ ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिह्यांत आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईसह कोकणात १५ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, पण १६ ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे साताऱ्यात तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुंबईसह कोकणात १५ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल

मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, जालना, परभणी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव

अतिमुसळधार पावसाचा इशारा या जिल्यात – यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा

हलक्या सरी – धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर

हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *