जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द

Oplus_131072

पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द झाला आहे.जैन धर्मीयांच्या भावना दुखावण्याची इच्छा नसल्याचे कारण बिल्डरने दिल.

सविस्तर वृत : पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागे संदर्भात मोठे वादंग निर्माण झाला आहे. या जागेच्या व्यवहारा संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले होते. तर हा व्यवहार रद्द करावा यासाठी संपूर्ण राज्यभरातील जैन समाज हा रस्त्यावर देखील उतरला होता. मात्र आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला असून हा व्यवहार ज्या गोखले बिल्डर सोबत झाला होता, त्यांनीच या व्यवहारातून माघार घेतली असून HND ट्रस्टने 230 कोटी रुपये परत करावे आणि हा व्यवहार रद्द करावा, असा मेल गोखले बिल्डर कडून ट्रस्टला करण्यात आला आहे

विशाल गोखले यांनी ई-मेल पाठवला असेल तरी मला अद्याप विश्वास नाही. जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता ट्रस्टीच पळून गेले तर त्यांना कुठून पकडून आणणार. ट्रस्टींनी हा व्यवहार केला होता. खऱ्या अर्थाने विशाल गोखले खूप पैसेवाला नाही. तो पूर्वी लहान होता. पण 10-12 वर्षांत मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विशाल गोखले यांची संपत्ती वाढत गेली. पण मला या विषयावर बोलायचं नाही. कारण मला शिंदे साहेबांनी सांगितले आहे की, यावर बोलायचं नाही. विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे. विशाल गोखले खूप मोठा माणूस नाही. त्याला व्यवहार कोणी करायला सांगितला आणि नंतर कोणी काढायला लावलं यावर आपल्यलाा बोलायचे नाही. पण दोन दिवसांत हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या संपला पाहिजे. मी आता रात्रीही हा व्यवहार करणाऱ्या रजिस्ट्रारला आणू शकतो. तो कुठे राहतो, मला माहिती आहे. दोन दिवस मी गप्प बसेन हा शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आहे. ते माझे नेते आहेत. त्यांच्या मानसन्मान ठेवणं माझं काम आहे. पण मी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे की, मी चुकीचं वागणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी बोलणार, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले

पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द झाला आहे. गोखले बिल्डरने रविवारी रात्री या व्यवहारातून माघार घेतल्याची माहिती ट्रस्टींना ईमेलद्वारे दिली. नैतिकतेचा मुद्दा आणि जैन धर्मीयांच्या भावना दुखावण्याची इच्छा नसल्याचे कारण बिल्डरने दिले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत येण्यापूर्वीच ही माघार घेण्यात आली. या प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव गोवण्यात येत असल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली. फुढे या प्रकरणात काय होत हे पाहणे अपेक्षित आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *