पुणे शहरात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून एटीएस आणि पुणे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन चालू दहशतवादी असल्याची मिळाली माहिती

सविस्तर वृत : पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादी असल्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपासून राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने शहरातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले.या कारवाईत तब्बल 18 संशयित व्यक्तींचा शोध घेतला असून, काहींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. कोंढवा परिसरात ही कारवाई रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत गुप्तपणे चालू होती
पुणे शहरात काल (बुधवार) मध्यरात्रीपासूनच मोठ्या घडामोडी घडत आहे. काल रात्रीपासून पुण्यातील कोंढवा भागात ATSचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन सुरू केलं. या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे पुण्यात तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे
कोंढवा परिसरातील घनदाट वस्ती आणि मजूर वस्त्या यामुळे संशयितांना लपण्यास सोयीचे ठरतात. या भागात बांगलादेशी घुसखोर आणि इतर संशयितांचे जाळे सक्रिय असल्याची माहिती पूर्वीच समोर आली होती. दरम्यान बुधवारी मध्यरात्री १२ नंतर सुरू झालेली ही मोहीम गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होती. कोंढवा काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी १८ संशयितांचा शोध घेण्यात आला यापैकी काहींना ताब्यात घेतले. कारवाईपूर्वी मोठी गुप्तता बाळगण्यात आली
कोंढवा परिसरात संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत. 25 ठिकाणी पोलिस व एटीएस अधिकाऱ्यांकडून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे, अशी माहितीदेखील समोर येत आहे
