अण्णा हजारे हे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून गप्प का त्या वरून पुण्यात बॅनर बाजी करून झोपेतून जागे व्हा असे बॅनर लावण्यात आले
सविस्तर वृत : बॅनरवरून प्रसारमाध्यमांनी हजारे यांना बोलते केले. त्यावेळी हजारे म्हणाले, “आतापर्यंत मी भरपूर काम केले आहे. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलने करून पाठपुरावा करून 10 कायदे करण्यात यश मिळाले आहे. त्यातून माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकआयुक्त असे 10 वेगवेगळे कायदे झाले. आता वय झाले. मी 90 वर्षांचा झाल्यानंतरही मी काम करत राहायचे आणि तुम्ही झोपून राहायचे? अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर हे चूक आहे. माझ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मागच्या काळात मी जे केले ते आजच्या तरुणांनी करावे,” अशी अपेक्षा अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे
सध्या निवडणूक आयोबद्दल जी चर्चा आणि आरोप सुरू आहेत, त्यावर अण्णांनी आवाज उठवावा अशी अपेक्षा करताना टीकात्मक मजकूर लिहिलेला हा बॅनर आहे. अण्णांनी आतातरी झोपेतून जागे व्हावे, अशा शब्दांत बॅनरच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला होता.
महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मनसेला सोबत घेण्याची दाट शक्यता महायुतीचे टेन्शन वाढले सविस्तर वृत : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर…