अदानींची महाराष्ट्रात ८३ हजार कोटींची गुंतवणूक.

टाटाबरोबर अदानीनी ह्या व्यवसायात उडी घेतली आहे….

सविस्तर वृत्त: भारताला प्रगतशील राष्ट्र बनवण्यासाठी केंद्राकडून अनेक व्यवसायांना आणि भारतातील कंपन्यांना पाठबळ देवून व्यवसाय करण्यासाठी अनेक उद्योगपतींना प्रोस्ताहन देण्यासाठी केंद्रसरकार नेहमी अग्रेसर राहिले आहे. त्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वात सर्वात मोठे मोबाईल हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोदी सरकारकडून सेमी कंडक्टर पीएलआय (प्रोडक्शन लिंक इंसेंटिव्हव) स्कीम सुरु केली आहे

देशात बनलेली पहिली चीप (सेमी कंडक्टर) पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ च्या मध्ये येणार आहे. चीनला धक्का देण्याच्या तयारीने सिमे लागतच रतन टाटाकडून (टाटाग्रुप कडून) आसाम मध्ये २७००० कोटींचे काम सुरु केले आहे. या प्रकल्पात रोज ४८० कोटींची चीप तयार होणार आहेत. यामुळे सेमी कंडक्टर बनवणाऱ्या चीनला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ह्याच बरोबर आता अदानी समूहाने सुद्धा मोठा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात ते ८३००० कोटी रुपयांचा प्रकल्प भारतात सुरु करणार आहेत. त्यामुळे भारताची ताकद सेमी कंडक्टर चीप (मोबाईल हब) या उद्योगामुळे वाढणार आहे. यामुळे या उद्योगात सर्वात मोठा अग्रेसर असणारा देश चीन याची मक्तेदारी आता संपुष्टात येणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कायंस टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पात ५५ लाख सेमी कंडक्टर चीप दररोज बनवण्यात येणार आहेत. हा प्रकल्प ३३००० कोटींचा असून तो गुजरात मधील सानंद मध्ये सुरु करण्यात येणार आहे. सेमी कंडक्टर म्हणजे सिलिकॉन चीप ही चीप प्रत्येक इलेक्ट्रोनिक उत्पादनात वापरली जाते, त्यामुळे ह्या उद्योगाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या उद्योगाची निर्मिती भारताबाहेर म्हणजेच चीनकडे मोठ्या प्रमाणात केली जात होती. म्हणून भारत सेमी कंडक्टर आयात करत होता सेमी कंडक्टर शिवाय कोणतेही इलेक्ट्रोनिक उत्पादन बनवू शकत नाही. उदा.मोबाईल ,टी,व्ही ,लॅपटॉप, क्षेपणास्त्र ,एलईडी असे अनेक इलेक्ट्रोनिक वस्तू ह्या सेमी कंडक्टर मुळेच बनतात. सेमी कंडक्टर हे इलेक्ट्रोनिक वस्तूमध्ये मेमरी ओपरेट करण्याचे काम करते. सेमी कंडक्टर बनवण्यासाठी अदानी समूहाला इस्राइल हा देश मदत करणार आहे. यामुळे बाजूच्या देश चीन ह्याच्या भुवया उंचावल्या आहेत. ह्या प्रकल्पामुळे अनेक रोजगार मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, आणि यामुळे भारतामध्ये मोबाईल हा मेक ईन इंडिया या केंद्राच्या प्रोत्साहनाने बनवण्यात येतील. त्यामुळे मोबाईलच्या किंमतीमध्ये ग्राहकांना फरक जाणवणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *