वैष्णोदेवीच्या पदयात्रे दरम्यान दरड कोसळून जीवित हानी…..

सविस्तर वृत्त: माता वैष्णोदेवी संपूर्ण हिंदू धर्माचे एक पुज्जनीय स्थान आहे, अनेक भाविक भारतामधून तसेच भारताबाहेरील देशातून वैष्णोदेवीच्या दर्शनाला येत असतात. आज २ सप्टेंबरला सकाळी सगळीकडेच पाऊसाचे वातावरण असल्यामुळे भारतात पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत आहे. त्यातच माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी चालू झाली आहे.पदयात्रे दरम्यान सकाळी अचानक दरड कोसळल्याची माहिती समोर आली या दुर्घटनेत दोन महिला यात्रेकरू मरण पावल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच बचाव कार्यपथक पोहचून बचाव कार्य सुरु केले आहे. भूस्खलन झाल्याने दरड कोसळली आहे, त्यामुळे जखमी झालेल्या भाविकांना जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर वैष्णोदेवीचे दर्शन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती कटराचे एसडीएम(sdm) पियुष धोत्रा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मंडळाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनेची पाहणी करून बचाव कार्य सुरु केले. प्रशासनाने भाविकांना यात्रे दरम्यान सतर्क राहण्याचे आव्हाहन केले आहे. खबरदारी म्हणून यात्रे दरम्यान मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. रस्त्याची एकूणच परिस्थिती पाहता प्रशासनाने यात्रा न करण्याचा सल्ला देखील दीला आहे. भाविकांना पुन्हा माता वैष्णोदेवीचे दर्शन घेता यावे आणि सर्व पुन्हा पूर्ववत व्हावे यासाठी स्थानिक प्रशासन आणि वैष्णोदेवी तीर्थमंडळ एकत्र येवून बचाव कार्याचे काम सुरु केले आहे.
हवामान खात्याने या आधी जम्मू-काश्मीर मध्ये १२ सप्टेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील असे सांगितले होते. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे ही हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते, पण अचानक पडलेल्या दरडीमुळे वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनमध्ये घबराहट पसरलेली आहे वैष्णोदेवी मंदिर हे हिंदू धर्माच्या अनुयायांचे प्रचंड मोठे श्रद्धा स्थान आहे, गेल्या वर्षी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी विक्रमी गर्दी केली होती वैष्णोदेवी मंदिर हे १०८ शक्ती पीठांपैकी एक शक्ती पिठ आहे. दरवर्षी लाखो भाविक या तीर्थ क्षेत्राला भेट देतात, सर्वात जास्त भारतीय लोकं वैष्णोदेवीच्या दर्शनाला येत असेतात, हे मंदिर भारतातील अनेक श्रीमंत मंदिरापैकी एक मंदिर मानले जाते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये अनेक भाविक इकडे दर्शनाला येत असतात मंदिराचे व्यवस्थापन प्रशासन आणि माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाद्वारे सांभाळले जाते. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक आणि भाविक यांच्या मध्ये घबराहटीचे वातावरण सध्या आहे, प्रशासनाकडून होईल तेवढी मदत ही जखमींना आणि बचावकार्यासाठी केली जात आहे .
