अंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) जय शाहा यांची बाजी.

भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव यांची अंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत अध्यक्ष म्हणून निवड…

सविस्तर वृत्त: भारतीय क्रिकेट मंडळाचे सर्वेसर्वा सध्या जय शाहा आहेत. आताच त्यांच्या कारकिर्दीत भारताने टीट्वेंटी वर्ल्ड कप आपल्या नावे केला. आणि जय शाहा यांनी(BCCI) कडून आपल्या टीमच्या मेह्नतीवर खुश होवून भारतीय क्रीकेटकांवर बक्षिसांचा वर्षाव केला.

सध्या जय शाहा यांचे क्रिकेट बोर्ड तसेच अंतराष्ट्रीय बोर्ड यामध्ये चांगले वर्चस्व आहे. याच वर्चस्वामुळे न्यूझीलंडच्या ग्रेट बार्कल हे (ICC) अध्यक्ष पदासाठी लढणार नसल्याचे जाहीर होताच जय शाहा यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. आणि जय शाहा यांनी अर्ज दाखल केला. जय शाहा यांचा अंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वर्चस्व पाहता त्यांच्या विरोधामध्ये क्रिकेट बोर्डमधून (ICC)कोणीही विरोधक उभे न राहिल्यामुळे जय शाहा यांची अंतराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड मध्ये बिन विरोध अध्यक्ष म्हणून निवड झाली. जय शाहा हे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून (ICC) चे नेतृत्व करणारे व्यक्ती ठरले आहेत. आणि भारताकडून (ICC) चे नेतृत्व करणारे ते पाचवे व्यक्ती आहेत. जय शाहा हे (ICC) चे अध्यक्ष होताच भारताकडून आणि अंतराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट प्रेमींकडून शूभेछांचा वर्षाव केला जात आहे. (BCCI) ने ex मार्फत जय शाहा यांना शुभेछां दिल्या आहेत. जय शाहा यांची (ICC) अध्यक्ष पदाची कारकीर्द १ डीसेंबर २०२४ पासून चालू होत आहे. जय शाहा हे सध्या (BCCI) चे सचिव आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. जय शाहा यांची (ICC) अध्यक्ष पदी निवड झाल्यावर प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले कि, जागतिक स्तरावर क्रिकेटला आणखी उंची मिळवून देण्यासाठी मी(ICC) मधील सदस्य देशांसोबत काम करण्यासाठी कटीबद्ध आहे. आम्ही अधिक फोर्माट्चे क्रिकेटचे एकत्रीकरण आणि समतोल राखणे, नवीन तंत्रज्ञांचा अवलंबन करणे, आणि जागतिक  बाजारपेठेमध्ये प्रमुख स्पर्धांची ओळख करून देणे हे महत्वाचे आहे. क्रिकेटला दिवसेंदिवस अधिक लोकप्रियता कशी मिळेल असा आमचा उद्देश आहे. लोस एंजेलिस मध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या ओलम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश केला आहे, ही क्रिकेटच्या वाढीसाठी एक चांगली संधी आहे असे जय शहा म्हणाले.

जय शाहा (ICC) अध्यक्ष होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे टेन्शन वाढले आहे, कारण २०२५ मध्ये आशिया कपाचे यजमान पद हे पाकिस्तानकडे आहे आणि भारताकडून ह्या कपसाठी पाकिस्तानात जावून खेळण्यास (BCCI) कडून नकार देण्यात आला आहे. अशातच(BCCI) ने हायब्रीड मोडेलचा प्रस्ताव पाकिस्तान समोर ठेवला आहे. या सर्व बाबींना लक्षात घेऊन जय शाहा हे(ICC) अध्यक्ष झाल्यावर पाकिस्तानचे टेन्शन वाढणे साहजिकच आहे, कारण जय शाहा यांच्या हातात(ICC) अध्यक्षपदाची धुरा डीसेंबर मध्ये आल्यावर २०२५ चा आशिया कप हा जय शाहा यांच्या अद्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे भारताच्या विरोधी जाऊन काही गोष्टी करणे, हे पाकिस्तान बोर्डाला भोगावे लागू शकते.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *