लाडकी बहिण योजनेसाठी सरकारकडून नवीन अपडेट.

लाडकी बहिण योजनेत जुलैनंतर केलेल्या अर्जांना मिळणार ४५००…

सविस्तर वृत्त: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही सरकारने केलेली एक मोठी योजना आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना रक्षाबंधन पूर्वी ३००० रुपये खात्यात जमा झाले. त्या नंतर या योजनेचा बोलबाला अधिक प्रमाणात होऊन महिलांनी ह्या योजनेत जास्तीत जास्त सहभाग घेतला, ह्या योजनेसाठी महिलांच्या रांगा आणि गर्दी प्रत्येक सरकारी बँकेमध्ये खात्या संदर्भात होऊ लागली आहे, आणि सरकारने दिलेल्या आदेशांवरून इतर काम करणाऱ्या सेवा (अंगणवाडी सेविका,सीएससी विभाग, संगणक परिचालक) यांना हे काम सोपवण्यात आले आहे. त्यांनी हे काम व्यवस्थितरित्या पार पाडून सरकारने दिलेल्या नियमावली प्रमाणे अर्ज ओनलाईन सबमिट करून घेतले आणि राज्य सरकार कडून ह्या अर्जाचे आणि त्यांच्या बँक खात्याचे सर्व त्रुटी पडताळून त्यांना त्यांच्या अर्जासंबधी स्वीकार केल्याचा संदेश मोबाईलवर पाठवण्यात आला, त्यानंतर ऑगस्ट १६ पासून लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सरकार कडून आता पुन्हा घोषणा केली जात आहे कि, ज्या लाभार्थ्यांना अर्ज करून सुद्धा पैसे आले नाहीत किंवा नवीन लाभार्थी महिला असतील त्यांना रक्कम ४५०० रुपये हे पुढील महिन्यात सप्टेंबर मध्ये जमा होणार आहेत. जी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. रुपये १५०० प्रमाणे ३ महिने मिळून दिली जाणार आहे. ह्या साठी सरकारकडून आपले खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे असे पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे.

३१ जुलै नंतर जिल्हा स्तरावर अर्ज पडताळणी सुरु आहे. अर्जाचा डाटा महिला व बालविकास विभागाकडे आल्यानंतर त्वरित यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी ex वर दिली आहे अदिती तटकरे यांनी असे म्हटले आहे कि, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ हा सर्व पात्र महिलांना मिळणार आहे. हा महाराष्ट्रातील महिला सबलीकरणाच्या क्रांतीचा विक्रमी टप्पा आहे. महाराष्ट्रातील २ कोटी ९ लक्ष ८७ हजार ७०८ महिला भगिनींनी माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे  अर्जाची छाननी ही युद्ध पातळीवर सुरु असून प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा ह्यासाठी  महिला व बालविकास विभाग कटीबद्ध आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *