महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर जाण्याचे संकेत  

दिवाळी नंतर विधानसभा निवडणुका पार पडतील असे आयोगाचे संकेत……..

सविस्तर वृत्त; महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोबरला पार पडतील असा अंदाज  काही राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात आला होता. कारण महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. अशातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर न करता निवडणुका लांबणीचे संकेत दिले आहेत.

झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या निवडणुका हरियाणा आणि जे एन्ड के यांच्या निवडणुका पार पडल्यावर होतील असे निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

तर महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर, तर झारखंड विधानसभेची मुदत ४ जानेवारी २०२५ पर्यंत आहे.

दिवाळी आधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज राजकीय तज्ञांकडून दिला जात होता. २०१९ मध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका एकाच वेळेला पार पडल्या होत्या. पण ह्या वेळी ह्या निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर न करण्यामागे काही राजकारण असू शकते का? असा सवाल पत्रकारांकडून विचारण्यात आला.

त्यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार ह्या आरोपाचे खंडन करून त्यांनी पत्रकारांना सांगितले की “ प्रश्न विचारणे सोपे आहे आणि आरोप करणे सोपे आहे” असे उत्तर त्यांनी देले.

महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडल्यामुळे निवडणुकीची बरीच कामे तसेच महाराष्ट्रात आता बरेच सण, उत्सव बाकी आहेत त्या मुळे निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले नाही. आयोगाच्या ह्या उत्तरामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एक अनोखी चर्चा रंगली आहे.

विरोधकांकडून सात्तत्याने आरोप केले जात होते की, “महाराष्ट्रात निवडणुका ह्या दिवाळी नंतरच होतील असे आरोप वारंवार केले जात होते” आणि आज ते आरोप सत्त्यात उतरले आहेत. महाराष्ट्रात निवडणुका लांबल्या असल्याने येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात जे एन्ड के आणि हरियाणा या राज्यातील निवडणुकांच्या तारखा आणि निकालांच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकारांना जाहीर केल्या .

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *