राष्ट्रवादी पक्षाची उदया सुप्रीम कोर्टात सुनावणी

राष्ट्रवादी कोणाची उदया होणार मोठा खुलासा………

 सविस्तर वृत्त: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या याचिकेवर उद्या मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याच्या लोकांचे आणि मंत्र्यांचे लक्ष असणार आहे. आगामी विधान सभा निवडणुक लक्षात घेवून सुप्रीम कोर्टाचा या प्रकरणावर अंतिम निकाल अपेक्षित असेल.

राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात माजी मंत्री मा.शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात या विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर उदया सुप्रीमकोर्ट सुनावणी देणार आहे. सुप्रिमकोर्टाचे जस्टीस श्री. सुर्यकांत आणि जस्टीस श्री. उज्वल भूयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतचीसुनावणी उद्या होणार असून, दुसरीकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या विरोधात माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

आता ही सुनावणी ह्या पूर्वी १४ ऑगस्टला होणार होती तरी आता या प्रकरणाची सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेत पुकारलेले बंड हे ऐतिहासिक बंड ठरले आहे. शिवसेना पक्षात फुट पडली तेंव्हा महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा भूकंप घडून आला होता. संबंधित प्रकरण थेट निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. निवडणूक आयोगाने काही दिवसांतच एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. तरी ह्या प्रकरणासाठी सुप्रीम कोर्टाने तेंव्हाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचा आदेश दिले होते, तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय हा विधानसभा अद्यक्षाना घेण्याचा आदेश दिला होता, पण शरद पवार गटाला विधानसभा अद्याक्षांचा निर्णय मान्य नसल्याने त्या विरोधात  संबंधित प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली .

संबंधित प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टात प्रलंबित आहेत. विधान सभा निवडणुकांच्या आधी ह्या प्रकरणाचा निर्णय लागणे महत्वाचा ठरणार आहे .  आणि सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणाच्या  सर्व बाबी तपासून योग्य तो निर्णय देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *