मराठी चित्रपट सृष्टीतील आणखी एक दमदार चित्रपट सध्या लांबणीवर जाताना पाहायला मिळत आहे.

धर्मवीर-२’ चित्रपटाचे प्रदर्शन सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्यामागे काही कारणे असल्याची चर्चा चालू आहे.
सविस्तर वृत्त : धर्मवीर हा चित्रपट जेव्हा लोकांनी पहिल्यांदा सिनेमा गृहात पाहिला तेंव्हा त्याचे चित्रीकरण, कलाकार आणि त्याचे संगीत एवढे प्रभावी होते की प्रेक्षकांना जणू आपले आनंद दिघे साहेब हे खरोखरच आपल्यामध्ये आहेत आणि ते आपल्या पाठीशी आहेत असे वाटू लागले . सिनेमागृहातून बाहेर पडताना लोकांना चित्रपटाबद्दल विचारले असता काही जुन्या माणसांना दिघे साहेबांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले. आणि दिघे साहेब आता आपल्या सोबत आहेत असे भासू लागले .
त्यानंतर त्याच आठवणीने चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांना धर्मवीर पार्ट-२ लवकरात-लवकर निर्मित होऊन आम्हांला पुन्हा दिघे साहेबाच्या आठवणीने जागृत व्हायचे आहे असे निर्मात्यांना प्रेक्षकांकडून वारंवार सांगण्यात आले . प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीला धर्मवीर पार्ट- २ लवकरच काढू असे निर्मात्यांनी सांगितले. त्या नंतर निर्माते मंगेश देसाई धर्मवीर -२ साठीच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आणि चित्रपट तयार होऊन प्रेक्षकांच्या भेटीला ९ ऑगस्ट ला प्रदर्शित होईल असे धर्मवीर -२ च्या निर्मात्यांनी सांगितले होते पण काही कारणास्तव चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस येईल .

कारण काही विश्लेषकांचे असे म्हणणे आहे कि, “चित्रपट ऊशीरा प्रदर्शित होण्याची कारणे आगामी विधानसभा निवडणुका आणि धर्मवीर-२ चे लांबलेले प्रदर्शन याचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे”. कारण शिंदे यांच्या राजकीय रणनीतीचा भाग यांच्या शिवसेनेतील गाजलेल्या बंडाच्या पार्श्व भूमीवर प्रदर्शित झालेले धर्मवीर ह्या चित्रपटाची निर्मिती ही त्यांच्या व्यापक राजकीय रणनीतीचा भाग होता अशी चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरु असते .
आनंद दिघे हे शिंदे यांचे राजकीय गुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाना सामोरे जात असताना वैफल्य ग्रस्त अवस्थेतून बाहेर काढत शिंदेंची राजकीय स्थिती मजबूत करण्या मागे दिघे साहेबांची निर्णायक भूमिका राहिली. ठाणे जिल्हा आणि शिवसेना हे अनेक दशकांमध्ये एक वेगळेच राजकीय समीकरण राहिले आहे .
आज ठाणे जिल्हा खऱ्या अर्थाने आनंद दिघे साहेबांच्या नावाने ओळखला जातो. दिघे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना त्यांनी ठाणे जिल्ह्याचा आणि तेथील सर्वधर्मीय शोषित वर्गाचा उद्धार केला आणि ते सर्वांसाठी आपले गुरुवर्य राहिले. त्यामुळे शिवसेनेतील ऐतिहासिक बंडापूर्वी धर्मवीर प्रदर्शित होणे हा काही योगायोग मानला जात नाही.
पण ह्या सर्व्या राजकीय घडामोडींकडे प्रेक्षक वर्गानी नजरंदाज करून फक्त आनंद दिघे साहेबांना पुनः कसे पाहता येईल आणि लवकरात-लवकर कसे धर्मवीर-२ पाहता येईल. अशी निर्मात्यांकडे आणि त्यांच्या टीम कडे चित्रपट जेवढ्या लवकर प्रदर्शित कारावा अशी आशा बाळगली आहे .
