सारखं फुकट, सारखं माफ असं कसं चालेल म्हणणाऱ्या अजित पवारांच्या लेकानेच जमिन लाटल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

सविस्तर वृत : अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवर सरकार मेहेरबान झालं आहे. पार्थ पवारांवर जमिनीची खैरात करण्यात आली आहे. मुळची महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या घशात घालण्यात आली आहे. ‘सारखं फुकट, सारखं माफ असं कसं चालेल म्हणणाऱ्या अजित पवारांच्या लेकानेच जमिन लाटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अजित पवार शेतकऱ्यांना विचारतात सारखं फुकट कसं चालेल. त्याच अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थ पवारला पुण्यातली जमीन दिलीय, म्हणावं तर फुकटातच. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या या जवळपास 40 एकर जमिनीची किंमत आहे किमान 1800 कोटी आहे.
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला ही जमीन मिळालीय फक्त 300 कोटींना. ही जमीन आता सरकारी जमीन आहे.त्याच जमिनीवर डल्ला मारण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवर सरकार मेहेरबान झालं आहे. पार्थ पवारांवर जमिनीची खैरात करण्यात आली आहे. मुळची महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या घशात घालण्यात आली आहे. ‘सारखं फुकट, सारखं माफ असं कसं चालेल म्हणणाऱ्या अजित पवारांच्या लेकानेच जमिन लाटल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
महत्वाचे म्हणजे, पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे भाग भांडवल केवळ 1 लाख रुपये असताना, त्यांनी 300 कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या जमीन व्यवहार प्रकरणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया कंपनीला नोटीस पाठवली आहे. या नोटिशीद्वारे कंपनीला 2 टक्क्यांप्रमाणे 6 कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुण्यात आक्रमक झाले. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यात आंदोलन केलं. या आंदोलनात अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणबाजी करण्यात आली. या आंदोलनावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
