धनगेकरानी भाजपवार केलेले आरोप भोवणार

 

भाजपावार आरोप केल्या मुळे धनगे करांना सोडावी लागणार शिंदे ची साथ

 

सविस्तर वृत : घायवळ टोळीने केलेला गोळीबार असो की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील जैन बोर्डिंगच्या जागेशी संबंधित कथित भ्रष्टाचाराचे आरोप… शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आपले इरादे स्पष्ट केले. महायुतीतूनच आरोप होत असल्याने भाजप नेतेही त्रस्त झाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप नेत्यांनी रविंद्र धंगेकर यांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेतून धंगेकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे

महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्याबद्दलचे एकनाथ शिंदे यांचे मत बदलले आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.महायुतीमध्ये दंगा नको, असे एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना पुण्यात जाहीरपणे सांगितले होते तरीही धंगेकरांनी भाजपा नेत्यांना टार्गेट करणे थांबवले नाही. धंगेकर हे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पाठवलेला हस्तक असून उद्धव सेनेचे संजय राऊत त्यांना हँडल करत आहेत. धंगेकरांचा धोका ध्यानात आल्यानंतर त्यांच्याबद्दलचे एकनाथ शिंदे यांचे मत बदलले आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या या दाव्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सांगतो, भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर,” असं रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे

आज आपण सर्वजण जे काही आहोत ते ह्या शहरातील लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे त्यामुळे युतीधर्म किंवा आघाडीधर्म पाळण्याअगोदर सर्वात अगोदर पुणेकरधर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात…? सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, मग नंतर पक्ष, युती – आघाडी, गट-तट हे सर्व…. असे ट्विट रविंद्र धंगेकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *