मुंबई महानगरपालिकेकडून अनेक अनधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई

 

मुंबई महानगरपालिकेकडून दिवाळीच्या सणासुदी अनेक अनधिकृत परवाना नसलेल्या फटाके दुकानांवर कारवाई मुंबई प्रदूषण मुक्त राहावी यासाठी केली कारवाई

सविस्तर वृत : बीएमसीच्या परवाना विभागाने अंधेरी पश्चिम, डोंगरी, चेंबूर आणि कुर्ला यांसारख्या भागांत ही जप्तीची कारवाई केली  महानगरपालिकेने शहरात बेकायदेशीरपणे फटाके विकणाऱ्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. चार दिवसांच्या कालावधीत अनधिकृत रस्त्यावरील विक्रेत्यांकडून ९४३ किलोग्रॅमपेक्षा जास्त फटाके जप्त करण्यात आले आहेत

वॉर्ड स्तरावरील पथके वैध परवान्याशिवाय विक्री करणारे किंवा जास्त प्रमाणात साठा करणारे विक्रेते शोधण्यासाठी सक्रियपणे तपासणी करत आहेत. एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, जप्त केलेला माल योग्य विल्हेवाटीसाठी मानखुर्द गोदामात पाठवला जातो किंवा सुरक्षितपणे नष्ट करण्यासाठी पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये ठेवला जातो

नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, आवाज आणि हवा प्रदूषण कमी करणारे फटाके वापरावेत. फटाक्यांमुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होते आणि श्वासोच्छवासाच्या समस्या  असलेल्या लोकांसाठी आरोग्याचा धोका निर्माण होतो, तसेच आग लागून जीव व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. कठोर नियम असूनही, शहरात अनेक अनधिकृत स्टॉल्स रस्त्यांवर आणि पदपथांवर कार्यरत आहेत आता दिवाळी संपण्या आधी किती अनधिकृत स्टॉल वर महानगर पालिका कारवाई करणार हे पाहणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *