महापालिकेच्या आयुक्तांच लाच घेतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत : जालना नगर परिषदेचे रुपांतर महानगर पालिकेत नुकतेच करण्यात आले आहे. या महापालिकेचा कारभार ही सुरू झाला आहे. मात्र याच महापालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महापालिकेच्या आयुक्तांनीच लाच घेतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या दालनातच ही लाच घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर आयुक्तांना ताब्यात घेवून चौकशीसाठी घेवून गेले आहेत. त्यामुळे चौकशीत आणखी काही बाहेर येते का हे पाहवं लागणार आहे. चौकशीनंतरच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचं ही सांगितलं जात आहे
एका एका ठेकेदाराला देण्यासाठी त्यांनी एक कोटींची लाच मागितल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या लाचेचा पहिला हाफ्ता म्हणून 10 लाख रूपये देण्याचं निश्चित झालं होतं. त्यानुसार हा पहिला दहा लाखांचा हाफ्ता घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. लाच लुचपत विभागाचा दुसऱ्या पथकाकडून आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली जात आहे. आयुक्त संतोष खांडेकर यांनी महानगरपालिका गुत्तेदाराकडून दहा लाखाची लाचेची मागणी केल्या प्रकरणी, जालना महानगरपालिकेच्या दालनातूनच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले गेले. या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत विभागाचे पथक करत आहे.
प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा, अशी मागणी वकील रिमा खरात यांनी तपास यंत्रणेला केली आहे. आयुक्तांनी गोरगरिबांचे घरी पाडली, त्याचा हा परिणाम आहे. प्रभारी आयुक्त एसीबीच्या ताब्यात.. जी करवाई झाली ती योग्य आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे.
