ईपीएफओ कर्मचारी आपल्या पीएफ खात्यामधून 100% आपला स्वतःचा पीएफ काढू शकतात कसे आहेत नवीन नियम

सविस्तर वृत : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आहे. कारण आता पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढता येणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. पीएफ काढण्यासाठी आधी 13 वेगवेगळे नियम होते, आता ते नियम सोपे करून 3 प्रकारात विभागले गेलेत. आता शंभर टक्के रक्कम कशासाठी काढता येणार? जाणून घ्या…
आवश्यक गरजा (शिक्षण, विवाह, वैद्यकीय कारणे), गृहसंबंधी गरजा आणि विशेष परिस्थिती अशा तीन कारणांसाठी तुम्ही पीएफ खात्यातून शंभर टक्के पैसे काढू शकता. शिक्षणासाठी दहा वेळा व लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढता येईल. हे दावे लगेच मंजूर केले जातील.
या नवीन नियमांमुळे पीएफ काढण्यासाठी लागणारा सेवेचा कालावधीही कमी करण्यात आला आहे. आता पीएफमधून आंशिक पैसे काढण्यासाठी किमान 12 महिन्यांची सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. हा एक मोठा बदल आहे, ज्यामुळे कमी सेवा झालेल्या सदस्यांनाही फायदा होणार आहे. ईपीएफओने हे देखील सुनिश्चित केले आहे की सदस्य आपल्या पीएफ खात्यात किमान 25% रक्कम शिल्लक ठेवतील. याचा उद्देश सदस्यांना उच्च वार्षिक व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवून देऊन निवृत्तीसाठी एक मोठा निधी तयार करण्यास मदत करणे आहे
सदस्य आता त्यांच्या ईपीएफ खात्यातील संपूर्ण पात्र शिल्लक रक्कम (कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचाही वाटा धरून) 100% पर्यंत काढू शकतील.
-पैसे काढण्यासाठी मर्यादा अधिक लवचिक करण्यात आली आहे.
-शिक्षणासाठी 10 वेळा पर्यंत पैसे काढण्याची परवानगी
-विवाहासाठी 5 वेळा पर्यंत पैसे काढण्याची परवानगी
याआधी या दोन्ही गोष्टींसाठी फक्त 3 वेळाच पैसे काढता येत होते
EPFO च्या या पावलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी धावपळ थांबणार असून, पीएफ काढण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात तात्काळ मदत मिळू शकेल. या सुधारणांमुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे
