एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात मिळणार बोनस आणि उचल सुद्धा

सविस्तर वृत : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून पगारवाढीबाबत आणि आर्थिक अडचणींबाबत आंदोलन केलं जात होतं. अखेर दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 6000 रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाला दर महिन्याला 65 कोटी रुपये देणार आहे. हे पैसे सलग चार वर्षे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे

राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुला हात सोडण्यात आला आहे. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची दर महिन्याला 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय यंदा दिवाळीनिमित्ताने 6 हजार रुपये कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्यात येणार आहे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे

एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?

-१२५०० रूपये सण उचल

-सरासरी ७५०० वेतनवाढ फरक हप्ता (प्रति महिना)

-६००० रुपये दिवाळी भेट रक्कम

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाकी मागण्या प्रलंबित आहेत. सध्या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसल्याने लगोलग मागण्या मान्य करण्यास अडचणी येत आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट करीत दिवाळी सणाआधी बाकी मागण्यांवर तोडगा काढण्याची तयारी दाखवली आहे.

दिवाळी बोनसकडे लक्ष लागून असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून दिवाळीआधीच ६ हजार रूपयांचा दिवाळी बोनस खात्यात जमा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अधिकच्या बोनसची अपेक्षा होती. मात्र ६ हजारांच्या बोनसने ‘कही खुशी कही गम’ अशा संमिश्र भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहेत अधिकच्या बोनसची अपेक्षा होती. मात्र ६ हजारांच्या बोनसने ‘कही खुशी कही गम’ अशा संमिश्र भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *