भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा नसून कर्णधार पद नवीन खेळाडूकडे

भारतीय क्रिकेट निवड समितीकडून नवीन कर्णधार आता रोहित शर्मा नसून भारतीय टीमचे  नेतृत्व शुभम गिलकडे

 

सविस्तर वृत : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयची शनिवारी (दि.4) एक दीर्घ बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 26 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल याची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवून ही जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे आता टेस्ट आणि वनडे दोन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलकडे असेल. या बैठकीनंतरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी वनडेच्या कर्णधारबदला बाबत माहिती दिली आहे. खरं तर तीनही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार असणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असतं.पण सध्या हा सर्वात कमी खेळला जाणारा फॉरमॅट आहे. तसेच आम्हाला टी20 वर्ल्ड कपवरही लक्ष्य केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे शुभमन गिलला जुळवून घेण्यासाठी ही वेळ देण्याची योजना आहे, असे आगरकरने सांगितले.

अजित आगरकरनं या पत्रकार परिषदेमध्ये रोहितला हटवून शुबमन गिल वन-डे टीमचा कॅप्टन का झाला? याची माहिती दिली. त्यानं सांगितलं की, तिन्ही फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे कॅप्टन असणे ही गोष्ट फारच अव्यावहारिक आहे. म्हणूनच आम्ही शुभमन गिलला वनडे कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि विराट सध्या एकच फॉरमॅट (वनडे) खेळत आहेत. त्यांच्या 2027 मधील वर्ल्ड कप खेळण्याबाबत आज चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण टीमचा कॅप्टन बदलण्यावर आमचे मत ठाम होते.

वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ

शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.

ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ

सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *