ठाण्यात एसीबी कडून मोठी कारवाई

ठाणे महानगरपालिका उपायुक्त 35 लाखाची  लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अटकले

सविस्तर वृत : ठाणे महापालिकेअंतर्गत अतिक्रमणाचा विषय गंभीर बनला आहे. कोर्टाने फटकाल्यानंतर अतिक्रमणावर कारवाईस ठाणे महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाची घंटाळी परिसरात जागा असून त्या जागेवर अतिक्रमण झाले होते.हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांनी तब्बल 35 लाख रुपयांची मागणी केली होती

एसीबीने छापा टाकल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. एका बड्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायाकडे लाखो रुपयांची पैशांची लाच मागितल्याची चर्चा आहे. संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अधिकाऱ्याने कथित लाचेची मागणी केली. लाचेची तीच रक्कम घेऊन विकासक गेला असावा, अशी चर्चा आहे. संबंधित बांधकाम व्यवसायिकाने एसीबीकडे याबाबत तक्रार केली असावी आणि सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं असावं, अशी चर्चा आहे

एसीबीच्या या कारवाईत आता संबंधित अधिकाऱ्यांकडे नोटांचं बंडल मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. बड्या अधिकाऱ्याने लाच घेतली असेल तर ते पैसे एसीबीच्या हाती लागू शकतात. तसेच त्या बड्या अधिकाऱ्यावर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशाप्रकारे अधिकाऱ्याने लाच घेण्याची ठाणे महापालिकेतील ही पहिली घटना नाही. याआधीदेखील तीन वर्षापूर्वी वैद्यकीय विभागातील एका अधिकाऱ्याने लाच घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्या अधिकाऱ्याला देखील एसीबीने पकडलं होतं

एकीकडे ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा होत असताना दुसरीकडे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्ताला 35 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याने त्यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *