मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आता आणखी एक नवीन तारीख समोर…..!
मागील वर्ष 2023 अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करण्याची घोषणा सरकारने केली होती. वर्ष संपल्यानंतरही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकार करू शकले नाही.आता मात्र सरकारचे ह्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठीच्या धोरणाला घेऊन नवीन दिशा आणि तारीख दिली आहे. आता, 31 डिसेंबर 2024 ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे.मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला घेऊन हायकोर्टाने सरकार ची कान उघडणी केल्यावर हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान सरकारने ही माहिती दिली.

त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सुद्धा कोकणवासियांचा यंदाचाही प्रवास खड्डेमय होणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे वाढणारा खर्च हा जनतेचाच पैसा असल्याची टिप्पणी हायकोर्टाने सुनावणी दरम्यान केली.
मुंबई गोवा महामार्गावरील दुरावस्थेबाबत हायकोर्टात दाखल जनहीत याचिकेवर सुनावणी झाली. त्यात जवळपास 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणवासियांचे हाल संपण्याची चिन्हे नाहीत. डिसेंबर 2023 अखेर महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत ह्याची प्रशासनाने आज हायकोर्टात कबुली दिली. वर्ष 2011 ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.

आज १२ वर्षे झाली तरी ही मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हे जनतेच्या पैश्यांसोबत आणि भावने सोबत अनेक सरकारे, अनेक ठेकेदार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी खेळत आहेत . ह्यांच्या निष्क्रिय धोरणांमुळे मुंबई गोवा महामार्गपूर्ण होण्यास एवढा विलंब झाल्यामुळे कोकण वासियांना (चाकरमान्यांना ) अनेक वर्षे आपल्या गावी जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
ह्या गोष्टीचे गांभीर्य ओळखून सरकारला आता तरी जाग यावी एवढेच कोकण वासियांचे म्हणणे आहे .

