सणासुदी महाराष्ट्रात पावसाचा हा हा कार जनजीवन विस्कळीत

Oplus_131072

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती NDRF कडून बचाव कार्य सुरू राज्याचे चिंता वाढली

 

सविस्तर वृत : एकीकडे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे, नवरात्राचा दुसरा दिवस जल्लोषात साजरा होत आहे. तर दुसरीकडे जीव वाचवण्यासाठी लोक मदत मागत आहे. महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या दृश्यं आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजवर 20 वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नाही जेवढा या चार दिवसांत झाला. ढगफुटीसदृश्यं झालेल्या या पावसानं होतं नव्हतं सगळं नेलं. गायी-गुरं, बकऱ्या, अगदी उभं पिकही आणि आपली माणसंही… इतकी भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे

मागच्या 48 तासांत मुसळधार पावसानं थैमान घातलं. ढगफुटी सदृश्यं झालेल्या पावसानं शेतं पाण्याखाली गेली, रस्ते वाहून गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला. कुणी आसऱ्यासाठी छतावर गेलं तर कुणी झाडाच्या शेंड्याचा आधार घेतला. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अखेर मदतीला NDRF चे जवान आले. त्यांनी रेस्क्यू करुन पुरातून बाहेर पडायला मदत केली. पण महाराष्ट्रात आताही तितकीच भीषण परिस्थिती आहे

२८ सप्टेंबरला राज्याच्या पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकरी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यासोबतच कृषी विभागानेही शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *