नाशिकच्या त्रंबकेश्वर मध्ये काही गाव गोल्डन कडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर (पत्रकारांवर) हल्ला करण्यात आला

सविस्तर वृत: लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर गंभीर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यातील एक पत्रकार हे गंभीर अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तीन पत्रकारांवर गावगुंडांनी जबर हल्ला केला. या हल्ल्यात पुढारी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या किरण ताजणे यांनी मारहाणीच्या घटनेवेळी नेमकं काय घडलं ते सांगितले. किरण ताजणे म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकनासाठी आलो आहे, असे सांगूनही त्यांना मारहाण केली गेली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लाठ्या आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करत हल्ला केला. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे आणि पत्रकार संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे
अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन पत्रकारांची विचारपूस करून नाशिक चे पोलीस अधिकारी यांना कॉल करून दोषी वर कठोर कारवाई करावी आणि नाशिक पालिकेवर आणि आशिकाऱ्यां च्या कामावर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणारत आता मुख्यमंत्री यांनी देखी कठोर कारवाई चे आदेश नाशिक पोलिसांना दिले आहेत
