मोदी सरकारचा निवडणुकी आधी मोठा दिवाळी धमाका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GST मध्ये केले मोठे बदल घरगुती वस्तू होणार स्वस्त तर काही गोष्टी होणार महाग

सविस्तर वृत : GST : ची काउन्सिलची 56 वी बैठक बुधवारी नवी दिल्लीत झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रस्तावांबाबत चर्चा झाली. सीतारमण यांनी स्पष्ट म्हटलं की, आता फक्त दोनच GST स्लॅब असणार आहेत. जे 5 % आणि 18 % असणार आहेत. म्हणजेच आता 12  आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब संपवण्यात आला आहे

मोदी सरकारनं जीएसटीच्या चारऐवजी दोन टॅक्स स्लॅबच्या निर्णयामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. मात्र, याचदरम्यान,चैनीच्या आणि हानीकारक असलेल्या वस्तुंसाठी वेगळा टॅक्स स्लॅब आणला गेला आहे, जो 40 टक्के इतका असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी दिल्लीत तब्बल 10 तास चाललेल्या जीएसटीच्या बैठकीत याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे

चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, आैषधे, आरोग्य विमा, पनीर पराठा, शार्पनर, पेन्सिल, वह्या, चार्ट, खोडरबर, नकाशे, दुर्मिळ आजारांच्या गोळ्या यावर एक टक्काही जीएसटी लागणार नाहीये. तेल, शाम्पू, इलेक्ट्रीक गाड्या, ब्रश, टूथपेस्ट, ब्रश, साबण, बटर, तूप, चीज, चिवडे, भूजिया, डायपर, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप्स, चष्मे, रोगनिदानाची उपकरणे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, जलसिंचन, तुषारसिंचनाची उपकरणे, शिलाई मशि, दुधाची बाटली या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागेल.

या वस्तू होणार महाग:

गाड्या, महागड्या कार, महागड्या विदेशीत बाईक, पान मसाला, शितपेय, सर्व पॅकेज्ड पेय हे आता महाग होणार आहेत. दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी हा सरकारकडून हटवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासोबतच लग्झरी गोष्टींवरील जीएसटी हा चांगलाच वाढवल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे जर तुमचे आलिशान गाडी किंवा बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावी लागणार हे स्पष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा नारा दिला होता. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतीय बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंची विक्री जास्त व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, नुकताच आता जीएसटीमधून घरात दररोज लागणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी सूट देऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

तुपापासून ते लोण्यापर्यंत आणि AC-TV, फ्रिजपर्यंत…GST मधून सूटका, 175 वस्तू अवाक्यात येणार, स्वस्ताईचे युग येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *