राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा प्रश्न उपस्थित केले राज यांचा शिंदे ना खोचक टोला

सविस्तर वृत : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहेराज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर होते. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांनी राज ठाकरेंना मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील, असं राज ठाकरे मध्यमाना म्हणाले
राज ठाकरेंनी चेंडू शिंदेंच्या पारड्यात टोलवला. मी याचं उत्तरं देऊ शकत नाही. मागच्या वेळी एकनाथ शिंदे गेले होते ना… नवी मुंबईला जाऊन त्यांनी उत्तर दिली होती ना.. मग त्यांना विचारा की, मुंबईकरांना त्रास होतोय, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.काल
उद्धव ठाकरे आणि आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. आता राज ठाकरे यांनी शिंदेंवर तिसरा अटॅक केला आहे.
