कोकणातील मनसे चे डॅशिंग नेतृत्व यांची पक्षातून हकालपट्टी वैभव खेडेकर झाले भावुक

सविस्तर वृत : वैभव खेडेकर यांनी नुकतीच काल भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. तर वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा कोकणात खुलेआम सुरू झाल्यात होत्या. मात्र या चर्चांदरम्यान, मनसे पत्रातून वैभव खेडेकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
मी काल कोकणातले मंत्री नितेश राणे यांना भेटलो. हे सत्य आहे. त्याला कारणही तसंच आहे. आमच्या पुण्यामधील माझे सहकारी गणेश पाटील, तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढली होती. त्यांना गणेशोत्सवात जेलमध्ये टाकणार होते. ती तडीपारी रद्द करण्यासा संदर्भात मी नितेश राणे यांची भेट घेतली. त्यांनी तात्काळ तिथल्या एसपी आणि आयजींना फोन करुन ती तडीपार थांबवा, अशा पद्धतीची त्यांना विनंती केली किंवा सांगितलं. आज त्यांची तडीपारी थांबली आहे. हे तुम्ही गणेश पाटील यांना विचारु शकता”, असं स्पष्टीकरण वैभव खेडेकर यांनी दिलं
गेल्या दोन महिन्यांपासून मी या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होतो. मी पक्षातील अनेक नेत्यांना फोन केला. अनेक नेत्यांना भेटलो. मी विनंती आणि आर्जव करत होतो की, राज ठाकरेंची भेट करुन द्या. पण दोन महिन्यात मला राज ठाकरेंची भेट मिळाली नाही. हे दुर्दैव आहे. कोकणात अनेक समस्या आहेत. त्यांचा खुलासा व्हायला पाहिजे”, असं वैभव खेडेकर म्हणाले.
“मला बडतर्फ केल्याच्या पत्रावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची स्वाक्षरी आहे. मी त्यांच्याच भेटीसाठी नेहमी जात होतो. ते देखील राज ठाकरे यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. साहेब तुला मेळाव्यात भेटतील, असं त्यांनी सांगितलं होतं. तरीही मी वाट पाहिली. पण मला आजतागायत त्याला यश आलं नाही.
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली म्हणून मी भाजपात जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या आणि या शंकेने माझी हाकलपट्टी करण्यात आली, असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं तर आजपासून माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन थांबवलं गेलं याचं दुःख असं म्हणत वैभव खेडेकर हे माध्यमांसमोर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. वैभव खेडेकर म्हणाले की माझ्या वीस वर्षाच्या कामाची पोचपावती आज मला मनसेकडून मिळाली पुढे हे म्हणाले की राज ठाकरे हे माझ्या हृदयात राहतील अशी भाऊ प्रतिक्रिया खेडेकर यांनी माध्यमांसमोर दिली.
