वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींची सुटका नाही

वैष्णवी हगवणे प्रकरणात कोर्टाने जामीन नाकारला आरोपींची सुटका नाही

 

सविस्तर वृत : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्र हादरून गेला होता. हुंडाबळीच्या प्रकारामुळे समाज मन ढवळून निघालं होतं. अखेरीस या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात 1670 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोपपत्रात एकूण 11 जणांना आरोपी करण्यात आलं आहे.

पुणे न्यायालयाने वैष्णवी हगवणे यांना हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यात त्यांची सासू, नणंद आणि पतीचा मित्र अशा तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणात न्यायालयाने काही गंभीर निरीक्षण नोंदवली आहेत, ज्यामुळे आरोपींना जामीन न देण्याचा निर्णय घेण्यात आला

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसार यांनी फेटाळून लावला. ‘हुंडाबळी हा समाजाला लागलेला मोठा कलंक आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.

शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर तीस जखमा आढळून आल्या होत्या. तिचा सातत्याने क्रूर पद्धतीने छळ केला जात होता. तिने सासरी आत्महत्या केली आहे. समाज माध्यमातील संवाद आणि साक्षीदारांची साक्षीमुळे वैष्णवीचा छळ होत असल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी नीलेशचे म्हणणे हगवणे कुटुंबीय ऐकत होते. त्याने वैष्णवीचा पती शशांक आणि नणंद करिश्माच्या मोबाइलमधील सीमकार्ड नष्ट केले. मोबाइल संवाद आणि आर्थिक व्यवहारातून करिश्मा आणि नीलेश एकमेकांच्या संपर्कात होते’, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील पवार आणि ॲड. निंबाळकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *