श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये स्फोट अनेक पोलीस मृत्युमुखी आणि जखमी

श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी या मोठ्या स्फोटाने देश पुन्हा ऐकदा हादरला.

सविस्तर वृत : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या जखमा ताज्या असातानाच शुक्रवारी (ता.14) रात्री पुन्हा एकदा मोठ्या स्फोटाने देश हादरला आहे.

श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या स्फोटाची तीव्रता दिल्लीतील स्फोटापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे

प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री हा परिसर मोठ्या स्फोटाने हादरला, ज्यामुळे धुराचे लोट आणि ज्वाळा हवेत पसरल्या होत्या. स्फोटात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर श्रीनगरचे उपायुक्त अक्षय लाब्रू यांनी स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली.

स्फोट इतका प्रचंड होता की मानवी अवशेष, हात ३०० फुटावर सापडले. स्फोटाचा आवाज श्रीनगरमधील दक्षिण भागात कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. प्राथमिक तपासानुसार, पोलीस स्टेशनमध्ये फरीदाबादहून आणलेले ३५० किलो अमोनियम नायट्रेट साठवले होते. त्याची हाताळणी करताना मानवी चूक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमोनियम नायट्रेट हा एक संवेदनशील रसायन असून त्याचे चुकीचे हाताळणी अनेकांच्या जीवावर परिणाम करू शकते. दुसऱ्या दाव्यानुसार, दहशतवाद्यांनी आधीच IED कारमध्ये लावलेले होते, आणि स्फोटाचा टप्प्यात अमोनियम नायट्रेटही स्फोटला कारणीभूत ठरले. याच पार्श्वभूमीवर, एका दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत आणि स्फोटाच्या कारणावर अंतिम निष्कर्ष लवकरच जाहीर करण्याची तयारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *