राज ठाकरे यांनी मत चोरी वरून राहुल गांधीच्या सुरात सुरु मिळवले त्यामुळे भाजपाचे टेन्शन वाढण्याची शक्यता

सविस्तर वृत : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाच मुद्दा उचलून धरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
पुण्यामध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. 2014 पासून मतांची चोरी करूनच सत्ता राबवली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. गेल्या दहा-बारा वर्षातला हा खेळ उघडा पडेल आणि म्हणून प्रकरण दाबलं जातंय असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय. राज ठाकरे यांनी याआधी ईव्हीएम विरोधामध्ये भूमिका घेतली होती. सोनीया गांधी, ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सुद्धा आपण केलं होतं. असं राज ठाकरे यांनी म्हटलय. दरम्यान, राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर देशभरात वातावरण तापले आहे. बिहार निवडणुकीत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलाय. आता राज ठाकरे यांनी सुद्धा सत्ताधार्यांवर वोट चोरीचा आरोप केला आहे
राज ठाकरे म्हणाले, “2016-17 पासून मी सांगतोय की मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. या बाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर मांडल्या होत्या, पण ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर ही जागतिक बातमी बनेल आणि परदेशातून दबाव येईल, तेव्हा सत्ताधाऱ्यांना जाग येईल असे राज पुण्यात बोलत होते
