मुंबई मेट्रो-3 एक्वा लाईन अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे.

सविस्तर वृत : मुंबईचा पहिला पूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग असून तो 33.5 किमी लांबीचा कुलाबा–आरे कॉरिडॉरवर धावेल. या मार्गावर एकूण 27 स्टेशन आहेत, त्यापैकी 26 भूमिगत आहेत. विशेष म्हणजे हा मार्ग थेट देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानतळांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर, वेळेची बचत करणारा आणि प्रदूषणमुक्त ठरेल.
या लाईनवरील प्रमुख स्टेशनमध्ये आरे कॉलनी, सीप्झ, मरोळ नाका, CSMIA T1-T2, बीकेसी, दादर, सिद्धिविनायक, मुंबई सेंट्रल, गिरगाव, CSMT, चर्चगेट आणि कफ परेडचा समावेश आहे. यामुळे शहरातील महत्वाची व्यावसायिक केंद्रे, रेल्वे स्टेशन आणि विमानतळ यांच्यातील जोडणी अधिक सक्षम होईल.मेट्रो-3 सुरू झाल्यामुळे ट्रॅफिक जाम कमी होणार, आरामदायक व सुरक्षित प्रवास उपलब्ध होणार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारी ही मेट्रो मुंबईकरांसाठी ऐतिहासिक ठरेल.
