अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वाला मुहूर्त काही सापडेना

कोकणवासी यांचा वनवास सुटणार कधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार कधी

सविस्तर वृत्त : मुंबई गोवा महामार्ग हा सर्वात मोठा महामार्ग म्हणून ओळखला जातो गेली अनेक वर्ष पूर्ण झालेला नाहीये अनेक सरकारे येऊन गेली पण कोणत्याही सरकारने या महामार्गावर बद्दल ठोस पावलं उचलून त्याला पूर्णत्वात नेलं नाही कारण हा महामार्ग कोकणवासीयांसाठी पुढे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाचा आहे तरी आज 14 वर्षे झाली तरी या महामार्गाची कामे अजूनही चालूच आहेत ह्या मार्गाला घेऊन अनेक आंदोलने झाली तरीही सरकारला जाग येत नाही ऐन सणासुधी च्या वेळी या महामार्गाचे काम चालू आहे सरकार अनेक उपयोजना करत आहे तरीही कोकणवासी यांना खड्ड्यांच्या साम्राज्यातून जीव मुठीत घेऊन आप आपल्या  घरी पोहोचण्यासाठी  12 ते 14 तास प्रवास करावा लागत आहे तरी सरकारने ह्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अनेक ठेकेदारांवर कारवाई केली आहे एवढे असून सुद्धा काम पूर्णत्वात गेलेली नाही महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी मुंबई महामार्ग ची पाहणी केली असता त्याने येत्या डिसेंबर पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे या गणपती आधी जेवढे शक्य होईल तेवढा रस्ता दुरुस्त करून गणेश उत्सवाला जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल असेही त्यांनी प्रसार माध्यमान जवळ बोलताना सांगितले बांधकाम मंत्री यांनी अधिकारी वर्ग यांना पण काही सूचना ही दिल्या आहेत जेणे करून कोणी कामात हलगर्जी पणा  करू नये असे निदर्शणात आल्यास त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री महोदय यांच्या काडून अधिकाऱ्याना सांगण्यात आले

अनेक सरकारानच्या आश्वासनानंतरही आज चौदा वर्ष झाली तरीही मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे या महामार्गावर अनेक जीवित हानी सुद्धा झाली आहेत  अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा मुंबई गोवा महामार्गासाठी आंदोलने केली की जेणेकरून हा महामार्ग पूर्ण होऊन कोकणवासी यांना सुखकर प्रवास मिळेल एवढा असून सुद्धा सरकार या महामार्गावर कानाडोळा करताना दिसत आहे अनेक वर्ष नेतेमंडळी कोकण वासियांच्या  तोंडावर आश्वासनाची पाने पुसताना दिसली आहेत कधी आता मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल आणि कधी या महामार्गाचा वनवास  सुटेल आणि कधी आमचा प्रवास जलद, खडे मुक्त्त आणि सुखमय होईल याची कोकण वासी वाट पाहत आहेत

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *