अकोला जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा काशीद च्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अकोला शहरातील शॉरवीन क्लासचे विधार्थी आणि शिक्षक असल्याचे प्राथमिक तपासात पोलीसा कडून समजले आहे.

सविस्तर वृत : रायगड जिल्ह्यातील ‘काशीद बीच’ येथे अकोला जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अकोला जिल्हा प्रशासनाला मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राम कुटे आणि आयुष रामटेके असं बुडालेल्या दोघांची नावे आहेत.
अकोला शहरातील शॉरवीन क्लासचे एकूण 3 शिक्षक आणि बारावीत शिकणारे 12 विद्यार्थी सहलीसाठी काशिद किनारी आले होते. शनिवारी सायंकाळी यातील काही मुले काशीद येथील समुद्र किनारी पोहण्यासाठी गेले होते. पोहता असताना यांतील शिक्षक राम कुटे,विद्यार्थी आयुष रामटेके आणि आयुष बोबडे हे तिघे समुद्रांच्या लाटांमध्ये खोल पाण्यात वाहून गेले. हे तिघे बुडत असल्याने त्यांच्या सोबत आलेल्या विद्यार्थ्यांनी काशिद समुद्र किनाऱ्यावरील पोलीसांना त्यांची माहिती दिल्याचे मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांनी सांगीतले आहे.
1) राम कुटे (वय 60 वर्षे) रा. अकोला, शिक्षक. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली PHC येथे पाठवण्यात आला आहे.
2) आयुष रामटेके (वय 19 वर्षे) रा. अकोला, विद्यार्थी. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरुड PHC येथे पाठवण्यात आला आहे.
3 ) आयुष बोबडे (वय 17 वर्षे) रा. अकोला हा विद्यार्थी सुखरूप आहे.
गेल्या सात वर्षांमध्ये काशीद बीच आणि चिकणी बीच या लोकप्रिय समुद्रकिनारपट्टींवर 32 पर्यटकांचे बुडून मृत्यू झाले आहेत.त्यापैकी काशीद बीचवर 29 जण व चिकणी बीचवर तीघाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नवीमुंबईतून अलिबाग समुद्र किनारी 1 नोव्हेबर रोजी फिरायला आलेल्या चौघा पर्यटक युवकां पैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
