महाराज इंदोरीकर यांनी कीर्तन सोडण्याचे संकेत दिले

Oplus_131072

इंदोरीकर महाराज नाराज असल्याचं बोललं जात आहे. फेटा खाली ठेवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे.

सविस्तर वृत : आपल्या कीतर्नाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तन सोडण्याचे संकेत दिले आहेत. लेकीच्या साखरपुड्यावर टीका झाल्यानं इंदोरीकर महाराज नाराज असल्याचं बोललं जात आहे. फेटा खाली ठेवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे

इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला. जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाहीथाट बघायला मिळाला. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली. एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला. मात्र, या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली. किर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले

इंदोरीकर महाराजांनी या ट्रोलर्सना थेट प्रश्न विचारत आपल्या भावना व्यक्त केल्या. इंदोरीकरांन म्हटलं की, “लोक इतके खाली गेले आहेत की, माझ्या मुलीच्या अंगातील कपडे कसे आहेत, यावरून लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? तिच्या बापाला म्हणेज मला घोडे लावा. माझा पिंड गेलाय यात, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे?”

“माझी मुलं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ होत नव्हती, आणि आता तुम्ही इतकं खाली गेलात. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल?” असा सवाल देखील इंदोरीकर महाराजांनी उपस्थित केला

माझ्याबद्दल काहीही बोललं असतं, पण कुटुंबावर बोलणं चुकीचं आहे. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे, पण आता वाटतं, की इंदुरीकरनेच कीर्तनं थांबवली पाहिजेत. लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे, मग फेटा ठेवून देणंच बरं. काही दिवसांपासून विचार करतोय… दोन-तीन दिवसांत निर्णय घेणार आहे.” महाराजांनी स्पष्ट सांगितले की, “मी समर्थ आहे उत्तर द्यायला, पण हे सर्व कुटुंबावर आलं की त्याचं दुःख जास्त होतं. त्यामुळे आता थांबतोय. असे महाराज म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *