CM देवेंद्र फडणीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना निवडणुकी आधी डिवचल

सविस्तर वृत : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ‘विजय संकल्प मेळावा’ कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की 2017 च्या बीएमसी निवडणुकीत
भाजप शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागांनी मागे होता आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने महापौर देण्याच्या स्थितीत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नाराजगीमुळे आणि शिवसेना नेत्यांच्या आग्रहामुळे भाजपने महापौर आणि उपमहापौर पद शिवसेनेला दिले.
फडणवीस म्हणाले की “ब्रँड ठाकरे तेव्हाच होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, आज उद्धव ठाकरे कोणताही ब्रँड नाहीत.” अलीकडील बेस्ट युनियन निवडणुकीत भाजप कार्यकर्ते शशांक राव यांनी शिवसेना-मनसे आघाडीला पराभूत करून त्यांची हवा काढली, असेही त्यांनी नमूद केले.
भाजप कार्यकर्त्यांना उत्साहित करत फडणवीस यांनी स्पष्ट केले की येत्या बीएमसी निवडणुकीत महायुतीचा झेंडा नक्की फडकेल आणि महापौर भाजपचाच होईल.या मध्ये आता उबाटा गटाकडून काय पलटवार होतोय आणि याच उत्तर उद्धव ठाकरे दसऱ्या मेळाव्यात देणार का? हे पाहणे देखील अपेक्षित राहील.
