दोन चिमुकल्यांच्या अत्याचारानंतर बारा तासांनी गुन्ह्याची नोंद ………….

सविस्तर वृत्त: बदलापूर पूर्वेला असणाऱ्या सर्वात मोठी व जुन्या शाळेमध्ये हा गुन्हा घडला आहे. या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुली लघुशंकेसाठी जात होत्या त्या वेळी शाळेतीलच एका कर्मचार्याने दोघींवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
ही धक्कादायक घटना कुटुंबियांना समजल्यावर ते बदलापूर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी सुरवातीला गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली, या घटनेची माहिती समजताच बदलापुरात पोलिसांबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल बदलापूर वासियांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. लैंगिक अत्याचारामधील एक पिडीत मुलगी शाळेसाठी जाण्यास तयार होत नव्हती आणि घरच्यांकडून कारण विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला हा प्रकार ऐकून तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आणि लागलीच त्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. याच प्रमाणे आणखी एका मुलीबरोबर सारखाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी आणि कुटुंबीयांनी एकत्र येऊन सोळा ऑगसस्टला दुपारी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता त्यांना मध्यरात्री पर्यंत बसवण्यात आले आणि एफ आय आर नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. दोन्ही कुटुंबियांकडून पोलिसांना वारंवार विनवण्या करण्यात आल्या तरी देखील पोलिसांनी त्यांना नजरंदाज केले,पोलिसांच्या ह्या वागणुकीवर पीडितांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेऊन त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
अखेर बदलापूर मध्ये एका पक्षाने हस्तक्षेप करत वरिष्ठ अधिकार्यांना संपर्क केला आणि घटनेचे गांभीर्य तसेच पोलिसांचा हलगर्जीपाणाचे कृत्य सांगून एफ आय आर नोंदविण्यास सांगितले घटनेचे गांभीर्य ऐकून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यास खडसाऊन एफ आय आर नोंदविण्यास सांगितला. या घटनेचा एफ आय आर पीडितांच्या संघर्षानी आणि त्या पक्षाच्या आणि हस्ताक्षेपानंतर नोंदविण्यात आला, पोलिसांच्या ह्या कारभारावरून बदलापूर वासियांकडूनप्रखर संताप व्यक्त केला जात आहे जो प्रकार बदलापुरात घडला (शाळेत) ती शाळा खूप जुनी आणि नामांकित, सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पिढीतकुटुंबियांकडून आणि बदलापूर वासियांनकडून केले जात आहे.
