मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उमेद्वार देणार.

जरांगे पाटील लवकरच विधानसभेसाठी उमेद्वार जाहीर करणार..

सविस्तर वृत्त: मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी प्रमुख भूमिका घेवून राज्यात सर्वत्र सर्व मराठ्यांना एकत्र करून आरक्षणासंदर्भात सरकारला अनेक आंदोलने करून घाम फोडला आहे. सरकारनेही वेळोवेळी जरांगे यांना वेळ काढू आश्वासने देवून त्यांचे आंदोलने भरकटण्याचा प्रयत्न केला आहे, अशी जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडनुका तोंडावर आल्या असता हे भाष्य केले होते. सरकारला आरक्षणासंदर्भात अनेक वेळा आवाहने देवून सरकारवर दबाव आणण्याचा जरांगे कडून प्रयत्न केला गेला. आरक्षण मिळे पर्यंत मी शांत बसणार नाही न माझा मराठा समाज शांत बसणार, असे त्यांनी सरकारला खडसावून सांगितले सरकारला निवडणुकीदरम्यान अनेक वेळा त्यांनी चेतावणी दिल्या पण सरकारने यावर दुर्लक्ष केले त्यामुळे जरांगे यांनी सरकार विरुद्ध मराठा समाजाचे उमेदवार देण्याचे जाहीर केले त्यांनी सांगितले कि, जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जो आपल्याला पाचशे रुपयांच्या बॉंड वर लिहून देईल कि, मी तुमच्या सर्व मागण्याची सहमत आहे, त्याला आम्ही निवडून देवू अन्यथा त्याला आम्ही निवडणुकीत पराभूत करू अशी भूमिका जरांगे यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी मांडली होती.

उद्या जरांगे पाटील आपला पहिला उमेदवार जाहीर करणार आहेत विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्षपणे आपला उमेद्वार उतरवणार असल्याची जरांगे यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली होती. जिथे आपले उमेदवार निवडून येवू शकतात तिथे आपले मराठा समाजाचे उमेदवार उभे करू असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. ज्या एस सी आणि एस टी च्या जागा आहेत तेथे आपल्या विचारांचा आणि पाठींब्याचा उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणु असे जरांगे यांनी स्पष्ट केले जरांगे हे तेवीस जिल्ह्यातील इच्छुक मराठा समाजातील उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यातील उद्या एक उमेदवार जाहीर करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवार जाहीर झाल्याशिवाय मी माझे उमेदवार जाहीर करणार नाही. तर आम्ही निवडणुकीसाठी गनिमी काव्याने डाव टाकणार आहोत, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला जरांगे पुढे असे हि, म्हणाले कि, विरोधकांनी जसा आमच्या वर डाव टाकला तसाचा डाव आम्ही त्यांच्यावर टाकणार आहोत त्यांचे उमेद्वार कोण आणि ते कोणत्या मतदार संघातून उभे राहणार हे आम्हांला कळने गरजेचे आहे त्या मुळे आम्ही प्रत्यक्ष सर्व बाबी तपासून आमचे उमेदवार जाहीर करू असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट वक्तव्य केलें आहे. जरांगे पाटीलांच्या ह्या धोरणामुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना किती फटका बसतो हे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात समजने अपेक्षित असेल….

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *